मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही १५ जानेवारी रोजी (Tata Mumbai Marathon held on 15 January) होत असून या स्पर्धेमध्ये सर्व कॅटेगरीमध्ये तब्बल ५५ हजार स्पर्धकांनी भाग घेतला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर होत असलेल्या या मॅरेथॉनमध्ये १९० स्पर्धक असे आहेत की, त्यांचा यादिवशी वाढदिवस (190 runners birthday on the same day) आहे. यामध्ये १२ वर्षाच्या युवकापासून ८१ वर्षांच्या धावकाचाही समावेश आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी देश-विदेशातून स्पर्धक येत असतात. (Tata Mumbai Marathon)
१९० स्पर्धकांचा वाढदिवस : जगातल्या प्रख्यात १० मॅरेथॉनपैकी एक असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) यंदा १८ व्या एडिशनसाठी पूर्ण सज्ज झाली असून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धावणारे १९० धावक हे सुद्धा या मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या मॅरेथॉन मध्ये वाढदिवसाच्या दिवशी धावणाऱ्या १९० वाढदिवस स्पर्धकांमध्ये मुंबईची १३ वर्षाची पायल राठोड ही ड्रीम रनमध्ये धावणार असून या दिवशी ती आपला १३ वा वाढदिवस साजरा करत आहे. पायल या दिवसासाठी फार उत्सुक झाली असून मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणे म्हणजे एक स्वप्नच असल्याचे व त्यासोबत ड्रीम रनमध्ये धावणे त्याहून मोठे स्वप्न असल्याचे पायल सांगते.
८१ व्या वाढदिवशी मॅरोथॉन स्पर्धेत : मॅरेथॉनच्या दिवशी आपला ८१ वा वाढदिवस साजरे करणारे प्रभाकर जेजुरकर हे दुसऱ्यांदा या मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. दोन वर्षांपूर्वी २०२० साली त्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. परंतु आता दोन वर्षानंतर वाढदिवसाच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा होत असल्याने ते फार उत्सुक आहेत. प्रभाकर जेजुरकर याविषयी बोलताना सांगतात की, मॅराथॉनमध्ये धावणे म्हणजे आपला फिटनेस सिद्ध करणे असा आहे. माणसाने वयाची ८० गाठली तरी फिटनेसकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. आजच्या तरुण पिढीने फिटनेस बाबत जास्त जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. वास्तविक धावणे आणि चालणे यासारखा फिटनेससाठी चांगला व्यायाम नाही. योगा सुद्धा करायला हवा असेही ते सांगतात. या मॅरेथॉनमध्ये धावकांबरोबर पदपथावर असणाऱ्या व आम्हाला धावताना उत्साहित करणारा मुंबईकरांचा उत्साह बघितला तर अजून जास्त उर्जा भेटते असेही ते म्हणतात.
मॅरेथॉनचे विविध रंग : मुंबई टाटा मुंबई मॅरेथॉनचे (Tata Mumbai Marathon) आयोजक विवेक सिंग यांच्या म्हणण्यानुसार ५५ हजार स्पर्धक या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यामध्ये १९० जण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत आहे. ही फार विशेष बाब आहे. मुंबई मॅरेथॉन जागतिक स्तरावर नावाजलेली अशी मॅरेथॉन असून यामध्ये आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने धावणारे हे स्पर्धक सर्व वयोगटातील व सर्व कॅटेगिरी मधले असून या दिवशी त्यांना धावताना विशेष आनंद होणार आहे. मुंबई मॅरेथॉनची अनेक वैशिष्ट्य आहेत, त्याच्या अनेक कथा आहेत. ५५ हजार स्पर्धक नाहीत तर ५५ हजार बातम्या विविध रंगाने या मॅरेथॉनमध्ये बघायला भेटतात. वाढदिवसाच्या दिवशी धावणाऱ्या सर्व स्पर्धकांना विवेक सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या दिवशी धावणारे स्पर्धक : आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण हौशी मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या मध्ये प्राची बी यांचा 49 वा वाढदिवस आहे. तसेच अर्ध मॅरेथॉनमध्ये गार्गी देशप्रभू यांचा ४० वा निशान पांडे यांचा ३३ वा त्याबरोबर ड्रीम रन मध्ये पायल राठोड हीचा १३ वा, सीनियर सिटीजन मध्ये अशोक मल्होत्रा व पुष्पा मोदी यांचा प्रतेकी ७९ वा, रेखा भातखंडे यांचा ७५ वा, प्रभाकर मोहिते यांचा ७६ वा तर प्रभाकर जेजुरकर यांचा ८१ वा वाढदिवस असून हे स्पर्धक मोठ्या हौसेने या मॅरेथॉनमध्ये धावून आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.