ETV Bharat / state

Mumbai Crime: दुबईला माल एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली महिलेला लावला चुना; आरोपीला अटक

दिवसेंदिवस फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. दुबईला माल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताडदेव पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारदार रोशनी अंकित शहा वय ३४ वर्ष यांचा ग्राईन्ड वेल नॉट्रोन पेपर विक्रीचा व्यवसाय आहे.

Mumbai Crime
आरोपीला अटक
author img

By

Published : Feb 7, 2023, 9:16 AM IST

मुंबई : आरोपी मोहम्मद हुसेन शब्बीर भांनपुरवला (वय ४० वर्ष) याने रोशनी यांच्याकडून जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान एकूण ७२ लाख २१ हजार २६० रुपयाचा माल दुबई येथे एक्सपोर्ट करायचा म्हणून खरेदी केला. तो माल त्याने दुबई येथे एक्सपोर्ट न करता येथेच विक्री करून आलेले पैसे स्वतः घेतले. त्यानंतर तक्रारदार असलेल्या रोशनी यांना त्यांचे पैसे न देता अपहार करून त्यांची फसवणूक केली, म्हणून आरोपी मोहम्मद भांपुरवला याला ताडदेव पोलीसांनी अटक केली आहे. म्हणून आरोपी मोहम्मद भांपुरवला याच्याविरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सीआरपीसी अन्वये नोटीस : गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीस ४१(१) सीआरपीसी अन्वये नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्या आरोपीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपीने त्याचे, त्याचे घरातील सदस्याचे मोबाईल बंद करून, घर बंद करून तो परागंदा झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना आरोपीचा नवीन पत्ता पोलीसांनी प्राप्त केला.

१० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी : ५ फेब्रुवारीला आरोपीस वसई (पूर्व ) येथून ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपीला किल्ला कोर्टात हजर केले असता त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक शेंडे यांनी दिली आहे. ताडदेव पोलीस आरोपी मोहम्मद हुसेन शब्बीर भांनपुरवला याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. तसेच त्याच्यावर आणखी काही फसवणुकीचे गुन्हे आहेत का, याचा तपास करत असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूकीची घटना : मुंबईतल्या बोरिवलीतील वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 22 नोव्हेंहरला एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ४४ वर्षीय शेअर ट्रेडिंग एजंटला शनिवारी बोरिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. या प्रकरणात आरोपीने तक्रारदार महिला सेलिनो पिंटोची फसवणूक करत पैसे बनावट डिमॅट खात्यात वळते केल्याचा आरोप होता. सेलिनो पिंटो या महिलेचे शेअर्स आरोपीने ग्लोबल कॅपिटल मार्केटिंग नामक कंपनीच्या दुसऱ्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

हेही वाचा : Mumbai Crime : 2 आफ्रिकन तरुणांकडून 11 लाखांचे ड्रग्ज जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.