मुंबई: तारक मेहता का उल्टा चष्माचा वादग्रस्त निर्माता असित मोदी अडचणीत सापडला आहे. या निर्मात्यासह ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात, लोकप्रिय अभिनेत्रीने असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पवई पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवला आहे. पीडित अभिनेत्रीने आरोप केला आहे की, असित मोदीने यापूर्वी अनेकदा तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. सुरुवातीला, काम गमावण्याच्या भीतीने मी त्याच्या सर्व मागण्याकडे दुर्लक्ष केले. पण आता पुरे झाले मी यापुढे आपले शोषण करून घेणार नाही, असे ती पुढे म्हणाली.
आरोपांची पोलिसांकडून चौकशी- निर्मात्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने केलेल्या गंभीर आरोपानंतर पवई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने निर्मात्यावर सार्वजनिकरित्या आरोप केले आहेत. पवई पोलिसांना प्राथमिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ती गेल्या 15 वर्षांपासून लोकप्रिय टीव्ही मालिकेशी संबंधित आहे आणि 2021 ते 2023 दरम्यान लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत. पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली की, दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्रीने निर्मात्यावर तिच्या ओठांवर अयोग्य टिप्पणी केल्याचा आणि तिला मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केल्याचा आरोप केला. पीडितेने तत्सम विविध टिप्पण्या नमूद केल्या आहेत. या आरोपांची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे
तक्रारदार अभिनेत्री म्हटले, की ही तक्रार मी पैशासाठी करत नाही. हे फक्त सत्य आणि विजयासाठी करत आहे. माझ्यावर अन्याय केल्याचे त्यांना मान्य करावे लागेल. आम्हाला माफ करा, अशी हात जोडून माफी मागावी लागेल. ही माझ्या प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे, असे अॅक्टरने म्हटले आहे. असित मोदी यांनी हे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. या अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही म्हटले आहे.
मोनिका भदौरियाने केला आरोप: तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्री मोनिका भदौरियाने सेटवर निर्मात्याद्वारे छळ झाल्याचा आरोप केला होता. मुलाखतीत मोनिकाने हे देखील पुढे सांगितले होते की, सेटवर राहणे तिच्यासाठी फार त्रासदायक होते. आता पुन्हा एकदा मोनिकाने याबद्दल भाष्य केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बावरीची भूमिका साकारली. या शो ने माझे नक्कीच आयुष्य बदलविले. त्यामुळे हा शो माझ्यासाठी फार मोठा असल्याचे तिने म्हटले होते.
जेनिफर मिस्त्री बन्सीवालनेही केले आरोप : यापूर्वी जेनिफर मिस्त्री बन्सीवालनेही निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच शोचे निर्मात्या व्यतिरिक्त तिने काही कलाकारांवर देखील लैंगिक छळाचे आरोप केले होते. जेनिफरने पोलीस तक्रारीत असा दावा केला आहे की निर्माता मोदीने अनेकदा सेटवर तिच्याशी गैरवर्तन केले. मालिकेचे निर्माते, प्रोजेक्ट प्रमुख सोहेल रमाणी, कार्यकारी निर्माते, जतीन बजाज आणि दिग्दर्शकांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करून आरोप फेटाळून लावले. जेनिफर हे सर्व सूडबुद्धीने करत आहे कारण तिचा प्रॉडक्शन हाऊससोबतचा कामाचा करार हा समाप्त झाल्याचे मालिकेच्या टीमने म्हटले.
हेही वाचा-
- TMKOC: तारक मेहता...फेम मोनिका भदौरियाने छळ प्रकरणाचा केला पुन्हा एकदा खुलासा
- Monika Bhadoriya News : तारक मेहता का उल्टा चष्मामधील बावरीनेही निर्मात्यावर केले गंभीर आरोप, म्हणाली...
- Shailesh Lodha on Tarak Mehta : शैलेश लोढांनी सांगितले तारक मेहता शो सोडण्याचे कारण, म्हणाले - 'लेखकाच्या प्रतिभेच्या जीवावर पैसे कमवतात, पण...'