ETV Bharat / state

मुंबईत 2 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित - लाच

जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड याला २ लाख रुपयांची लाच मागण्याच्या गुन्ह्याखाली निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
author img

By

Published : Jun 14, 2019, 11:12 AM IST

मुंबई - जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड याला २ लाख रुपयांची लाच मागण्याच्या गुन्ह्याखाली निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार पीडितावर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत होती. या दरम्यान संबंधित व्यक्तीवर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करायची नसल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड या अधिकाऱ्याने तक्रादाराकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने पीडित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे याबद्दल तक्रार दाखल केली होती. पुरावा म्हणून तक्रारदाराने आरोपी पोलीस अधिकारी व तक्रारदार यांच्यामधील मोबाईल संभाषण रेकॉर्ड करून एसीबीकडे दिले होते.

या संदर्भात तडजोड करत तक्रारदारदाराने लाचेची रक्कम देण्याची तयारी दाखवली मात्र, या संदर्भात आरोपी पोलीस अधिकाऱयाला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेण्यास मनाई केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पडताळणी केली. या दरम्यान अधिकाऱ्याची चौकशी करत मोबाईल संभाषण व इतर पुरावे फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. या संदर्भात पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Intro:मुंबईतील जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या शिरीष मुरलीधर गायकवाड या पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून 2 लाख रुपयांची लाच मागण्याच्या गुन्ह्याखाली निलंबित करण्यात आले आहे. Body:जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार पीडितावर एमपीडिए च्या अंतर्गत कारवाई करण्यात येत होती. या दरम्यान संबंधित व्यक्तीवर एमपीडिए च्या अंतर्गत कारवाई करायची नसल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड या अधिकाऱ्याने तक्रादाराकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने पीडित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे या बद्दल तक्रार दाखल केली होती. पुरावा म्हणून तक्रादाराने आरोपी पोलीस अधिकारी व तक्रादार यांच्या मधील मोबाईल संभाषण रेकॉर्ड करून एसीबी कडे दिले होते. Conclusion: या संदर्भात तडजोड करीत तक्रारदार हा लाचेची रक्कम देण्याची तयारी दाखवली मात्र या संदर्भात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेण्यास मनाई केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पडताळणी दरम्यान या अधिकाऱ्याची चौकशी करीत मोबाईल संभाषण व इतर पुरावे फॉरेन्सिक लॅब ला पाठविले आहेत. या संदर्भात पोलिसांनी कलम 7 , भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.