मुंबई : निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी (Suspended DCP Saurabh Tripathi) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंगडिया खंडणी प्रकरणी (Angadia Extortion Case) निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींना अटकपूर्व जामीन मंजूर (DCP Saurabh Tripathi granted anticipatory bail) झाला आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime
उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर- मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. 25 हजारांच्या जामीनावर हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्रिपाठी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा सरकारी वकिलांची कोर्टात माहिती दिली.
सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार - सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात आंगडिया व्यवसायिकाने 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ( Hemant Nagarle ) यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची डीसीपी अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या हे दोन्ही अधिकारी जामीनावर बाहेर आहे. तर, सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार आहे.
त्रिपाठी यांना शोधण्यात मुंबई पोलीस अपयशी - सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात मुंबई पोलीस, उत्तर प्रदेश, लखनो, दिल्ली या राज्यात देखील मुंबई पोलिसांचे पथक शोध घेतला होता. मात्र अद्यापही सौरभ त्रिपाठी यांना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणांमध्ये सौरभ त्रिपाठी यांचे मेहुणे यांना देखील अहवाला मार्फत पैसे पुरवण्यात आलेल्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अटक केली होती.
त्रिपाठींची सर्वोच्च न्यायालयात धाव - या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये सौरभ त्रिपाठी यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. हवाला ॲापरेटर कडून खंडणी मागितल्याचा आरोप व्यावसायिकाने केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी चौकशी अधिकारी नेमले होते. या अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर या प्रकरणात एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले होते. मात्र या प्रकरणातील आरोपी माजी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्यापही फरार आहे. त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या ठिकाणी अद्याप त्यांची याचिका प्रलंबित आहे.
10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप - डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे.
खंडणीचा गुन्हा - या प्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याएल.टी. मार्ग पोलीस स्टेत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या अधिकार्यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत.