ETV Bharat / state

सुशांत आत्महत्या प्रकरण : सिद्धार्थ पिठाणीने मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले व्हाट्सअ‌ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट

author img

By

Published : Aug 4, 2020, 4:03 PM IST

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी जारी केलेले व्हाट्सअ‌ॅप मेसेज समोर आल्यानंतर सुशांतचा रूममेट म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ पिठाणी याने सुद्धा त्याच्याकडे असलेले काही व्हाट्सअ‌ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.

सुशांत सिंग प्रकरण
सुशांत सिंग प्रकरण

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना बिहार पोलिसांनी यामध्ये तपास सुरू केलेला आहे. दरम्यान सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी जारी केलेले व्हाट्सअ‌ॅप मेसेज समोर आल्यानंतर सुशांतचा रुममेट म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ पिठाणी याने सुद्धा त्याच्याकडे असलेले काही व्हाट्सअ‌ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दर दिवशी नवीन माहिती पुढे येत आहे. सुशांतसिंह हा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात गेल्या काही महिन्यांपासून नव्हता असे या व्हाट्सअ‌ॅप मेसेजवरुन कळून येत आहे. सुशांतसिंह राजपूतचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओपी सिंह याने सुशांतसिंह ला थेट मेसेज न करता सिद्धार्थ पिठाणी याला काही व्हाट्सअ‌ॅप मेसेज केले होते. जे सिद्धार्थ पिठाणी याने सुशांतसिंह राजपूतला फॉरवर्ड केल्याचे समोर आले आहे . या मेसेजवरुन असे कळते की सुशांतसिंह राजपूतचा मित्र परिवार, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती याबरोबरच सुशांतला असलेल्या सवयींना घेऊन त्याचे कुटुंबीय खुश नव्हते.

काय लिहिले आहे व्हाट्सअ‌ॅप मेसेजमध्ये -

या मेसेजमध्ये सुशांतचा मेव्हण ओपी सिंह म्हणतात, मला मुंबईला बोलविल्याबद्दल धन्यवाद! सुशांतने त्याची जबाबदारी घेतली असल्याने आम्हाला बरे वाटत आहे. मुंबईत आल्यावर जुन्या मित्रांना भेटता आले. पुढच्या मेसेजमध्ये ओपी सिंह म्हणतात, तुझ्या ज्या अडचणी आणि प्रॉब्लम आहेत. त्याच्यापासून माझ्या पत्नीला दूर ठेव. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या वाईट संगती, चुकीच्या सवयी व अनियोजनामुळे निर्माण झाल्या आहेत. तुझ्या मदतीसाठी मी नेहमी हजर असेन मात्र, तुझ्या अडचणी तू तिला सांगाव्यात जी तुझ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. तुझी प्रेयसी, तिचे कुटुंब व तुझा मॅनेजर ह्यांच्याकडे तू तुझे म्हणने मांडू शकतोस. सुशांतसिंह हा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हता अस सूत्रांकडून कळत आहे. सिद्धार्थ पिठाणी याने मुंबई पोलिसांना दिलेले व्हाट्सअ‌ॅप मेसेज हे फेब्रुवारी महिन्यातील आहेत.

सुशांतसिंह हा त्याच्या कुटुंबीयांशी बोलत नव्हता. मात्र, त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याचे मेव्हणे ओपी सिंह हे त्याच्या मित्राच्या मोबाईलवर मेसेज करून त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, सुशांतसिंहचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओपी सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या जोन 9 च्या डिसीपींना सुशांतसिंहच्या संदर्भात काही व्हाट्सअ‌ॅप मेसेज केले होते. मात्र, या संदर्भात स्वतः जोन 9 च्या डिसीपींनी ओपी सिंह यांना संपर्क केला. सोबतच, या प्रकरणी स्वतः येऊन लेखी तक्रार केल्या शिवाय सुशांतसिंह संदर्भात कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हे प्रकरण अनौपचारिक पद्धतीने सोडविण्यात यावे असे ओपी सिंह यांचे म्हणणे होते. ज्यास मुंबई पोलिसांच्या डिसीपी जोन 9 ने स्पष्ट नकार दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.