ETV Bharat / state

Metro Line: या मेट्रो लाईनच्या राष्ट्रीय सुरक्षा गार्डवतीने सर्वेक्षण होणार - यासाठी घेणार आढावा

Metro Line: शासनाने या संदर्भात दावा केलाय, की जशी मुंबईची लोकल ही जीवन वाहिन्या म्हणून पाहिले जाते. तसेच 'मुंबई मेट्रो रेल्वे तीन' सात आणि एक ह्या महत्वाच्या मेट्रो मार्गिका आहे. त्यासाठी धडाकेबाज रीतीने या शासनाने सर्व प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली.

Metro Line
Metro Line
author img

By

Published : Dec 6, 2022, 12:35 PM IST

मुंबई: मुंबई मेट्रो रेल्वे हा महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तर केंद्र शासनाच्या दृष्टीने कुलाबा ते वांद्रे सी मुंबई मेट्रो लाईन 3 हा भारताच्या आर्थिक राजधानी मधील महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे. शासनाने या संदर्भात दावा केलाय, की जशी मुंबईची लोकल ही जीवन वाहिन्या म्हणून पाहिले जाते. तसेच 'मुंबई मेट्रो रेल्वे तीन' सात आणि एक ह्या महत्वाच्या मेट्रो मार्गिका आहे. त्यासाठी धडाकेबाज रीतीने या शासनाने सर्व प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाला जपान सरकारने मोठी मदत केली आहे. आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा गार्डवतीने या तीनही ठिकाणची तपासणी होणार आहे, असे सूत्रांकडून समजले आहे.

अर्ध्या मार्गाचे काम : मुंबई महानगरात उपनगरामध्ये अंधेरी ते घाटकोपर ते वर्सोवा अशी एक मेट्रो धावत आहे .ही मेट्रो मार्गे पूर्व मुंबई आणि पश्चिम मुंबईला जोडणारी दुवा आहे. आणि या मेट्रोचा डेपो वर्सोवा येथे अंधेरीच्या जवळपास आहे. तसेच पश्चिम उपनगरामध्ये दहिसर पूर्वपासून ते अंधेरी पूर्व पर्यंतची मेट्रो मार्गीका उभारण्यात आलेली आहे. मेट्रो सात या मार्गावर निम्म्या मार्गाचे काम झालेले आहे, तिथपर्यंत मेट्रो धावत आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल.

सुरक्षा गार्डच्या वतीने आढावा: या मेट्रोचा डेपो हा चारकोप या उपनगराच्या ठिकाणी आहे. तसेच कुलाबा ते वांद्रे सिपझ या भुयारी मेट्रो मार्गीका तीनचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यापैकी भुयारीकरणाचे काम शंभर टक्के नुकतेच पूर्ण झालेले आहे. या मार्गीकांच्या ठिकाणी धोकादायक गोष्टी कोणत्या आणि सुरक्षेचे उपाय कोणते याबाबत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड यांच्यावतीने आढावा घेऊन उपाययोजना केली जाणार आहे.

मेट्रो स्थानकाची खबरदारी: बहुचर्चित मुंबई मेट्रो रेल्वे 3 साठी अरेच्या जंगलात उभारण्यात येणार आहे. अरे डेपो तसेच त्या मार्गीकेच्या काही संवेदनशील स्थानकांचे सर्वेक्षण होणार आहे. मेट्रो रेल्वे तीन आणि एक तसेच सात या मार्गीकांना राष्ट्रीय सुरक्षा गार्ड भेट देणार आहे. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने विविध धोक्याचे ठिकाण कोणते त्यावर सुरक्षा उपाय कसे करणार त्याचा आढावा घेतला जाईल. आरे जंगलातील कार शेड तसेच इतर मेट्रो कार शेड ला एनएसजी भेट देणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.