मुंबई Suraj Chavan Case: खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या युवा सेने नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना काल रात्री उशिरा अटक केली. (Aditya Thackeray) त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर केल्यांनतर न्यायालयाने सूरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. सूरज चव्हाण यांची ८ दिवसांची ईडी कोठडी ईडीकडून मागण्यात आली होती. (ED Custody) मात्र, त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
सुरज चव्हाण उत्तर देत नसल्यानं अटक: वकील दिलीप साटले यांनी सांगितले की, आम्ही कोर्टाला सांगितले सुरज चव्हाण यांचा या घोटाळ्यात सहभाग नाहीये. एफआयआरमध्ये सूरज चव्हाण यांचं नाव नाहीये. फक्त सूरज चव्हाण उत्तरं देत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांंना कोर्टाने येत्या चार दिवस म्हणजेच 22 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने थोडी मुभा दिल्याने सूरज चव्हाण यांच्या ED कोठडी दरम्यान १ तास वकीलांना आणि १ तास कुटुंबीयाना भेटायला मिळणार आहे. सूरज चव्हाण यांचे कोणा एका राजकीय व्यक्तीशी संबंध आहेत. म्हणून त्यांना आरोपी म्हणता येणार नाही, असं वकील दिलीप साटले यांनी सांगितलं आहे.
खिचडी वाटपाच्या कंत्राटात भ्रष्टाचार: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशिरा कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आढळलेल्या अनियमिततेच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात ज्या कंपनीला परप्रांतीय मजुरांना खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीने हा संपूर्ण घोटाळा 6.37 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप केला होता.
याआधी दोघांची चौकशी: काही महिन्यांपूर्वी ईडीनं सूरज चव्हाण यांच्या घरावरही छापे टाकले होते. दरम्यान, ज्यानं खिचडी खाल्ली त्याचा हिशेब द्यावा लागेल, असं भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचं वक्तव्य समोर आलं होतं. याआधी ईडीनं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांची चौकशी केली होती.
हेही वाचा: