ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरण; सुप्रिया सुळे, ऋता आव्हाड अन् पीडितेची प्रतिक्रिया - सुप्रिया सुळेंनी यांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात ( Jitendra Awhad Molestation Case ) आला. राज्यात चांगलच वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया ( NCP MP Supriya Sule reaction ) दिली. पत्नी ऋता आव्हाड यांनीही ट्विटरवरून त्यांचे मत ( Jitendra Awhad Wife Ruta Awhad reaction ) मांडले.

Supriya Sule and Ruta Awhad
सुप्रिया सुळे आणि ऋता आव्हाड
author img

By

Published : Nov 14, 2022, 6:18 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात ( Jitendra Awhad Molestation Case ) आला. यानंतर पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचे सांगत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया ( NCP MP Supriya Sule reaction ) दिली. त्याशिवाय पत्नी ऋता आव्हाड यांनीही ट्विटरवरून त्यांचे मत ( Jitendra Awhad Wife Ruta Awhad reaction ) मांडले.

आव्हाड विनयभंग प्रकरणावर सुप्रिया सुळे, ऋता आव्हाड यांची प्रतिक्रीया

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया : मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये,” अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली. त्याशिवाय राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांन याकडे माणूसकीच्या दृष्टीने बघितले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले. तो एकदा नाही, तर पाचवेळा पाहिला. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ हे घडल्याचे दिसत आहे. तिथे प्रचंड गर्दी होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रचंड पोलीस यंत्रणा असते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा, उत्साही कार्यकर्ते, सहकारी कार्यक्रमाला आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केले. समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केले. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी महिलेची बाजू ऐकून घेतली पाहिजे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे किती योग्य याचा सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा असे सुप्रिया सुळेंनी नमूद ( NCP MP Supriya Sule reaction ) केले.

ऋता आव्हाड : जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी पत्नी ऋता आव्हाड पुढे आल्या ( Jitendra Awhad Wife Ruta Awhad ) आहेत. त्यांनी ट्विटवर त्यांचे मत व्यक्त केले. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडले ती स्पोन्टेनिअस रिऐक्शन होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही. असे ऋता आव्हाड ( Ruta Awhad Reaction ) यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी घेतली राज्यपालाची भेट - गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील राजकीय नेत्यांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं ( Offensive statements by leaders about women ) केली जात आहेत. विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटात असलेल्या नेत्यांकडून महिलांविषयी अपशब्द ( Slander about women by Shinde faction leader ) वापरले जात आहेत, त्यामुळे महिलांचा अपमान होत आहे. तसेच गृहखात्याकडून अशा नेत्यांना समज देण्याऐवजी एकप्रकारे बळच दिलं जात असल्याने महिला नेत्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. आज विरोधी पक्षातील महिला आमदार, खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही भावना बोलून दाखवतानाच गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही अवधीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सत्तेतील नेत्यांचीच महिलांविरोधात विधाने - महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. त्यामध्ये खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते. यावेळी या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे गृहखात्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. राज्यातील सत्तेतीलच नेते महिलांविरोधात विधाने करत आहेत. अश्लील टिप्पणी केली जात आहे. त्यांना सरकारकडून साधी समज दिली जात नाही. गृहखात्याकडूनही या नेत्यांना समज दिली जात नसल्याचं या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितल आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरही या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विरोधकांना टार्गेट केलं जात असल्याचंही या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितलं.

नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात चर्चा - राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात यावेळी चर्चा करण्यात झाल्याचं सांगितलं जातं. राज्यपालांकडून यावेळी फडणवीस यांना काही सूचना करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.