ETV Bharat / state

Nawab Malik Bail Granted : अखेर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; 'हे' दिले कारण

राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला (Nawab Malik Bail Granted) आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिक हे कोठडीत होते. तब्येतीचे कारण देत मलिक यांनी अनेकवेळा जामीनासाठी (Nawab Malik Money Laundering Case) अर्ज केले होते.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Aug 11, 2023, 4:14 PM IST

Updated : Aug 11, 2023, 5:22 PM IST

मुंबई : राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने (Nawab Malik Bail Granted) त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे. नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी नवाब मलिक यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात जामीनाची (Nawab Malik Money Laundering Case) मागणी केली होती. त्यावेळी ईडीने जोरदार विरोध केला होता. मात्र, शुक्रवारी (11 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे.

दोन महिन्यांसाठी जामीन - मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय आधारावर जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगातच होते. आता ते दोन महिन्यांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहेत.

  • उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया!@nawabmalikncp @sanamalikshaikh pic.twitter.com/o1999r0ODN

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जामीनासाठी वेळोवेळी अर्ज - नवाब मलिक यांनी अनेकवेळा मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळीही मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन नाकारला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालायाने नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण - नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दहशतवादी, अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी कुर्ला येथील जमीन खरेदीत देखील बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप ईडीने ठेवलेला आहे. अनेक महिने ते त्या आरोपात तुरुंगात आहेत. परंतु, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव ते खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळेच हेच कारण देत नवाब मलिक यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

  • .@ncpspeaks चे लढवय्ये नेते, माजी मंत्री @nawabmalikncp यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भाई आपले मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत!

    आप डटकर लड़े... pic.twitter.com/cFl7EjTMGx

    — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मलिक कोणत्या गटात? - अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. आता नवाब मलिक ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यामुळे ते कोणत्या गटाकडे जाणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. तसेच मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यात अनिल देशमुख, रोहित पवार, विद्या चव्हाण, महेश तपासे यांनी ट्विट करत मलिकांचे अभिनंदन केले. तसेच एकत्र लढू, असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा - Central Agencies Misuse : केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होतोय का? वाचा सविस्तर

Last Updated : Aug 11, 2023, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.