मुंबई Nawab Malik News : टेरर फंडिंगच्या आरोपाच्या आधारे नवाब मलिक यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत खटला दाखल आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना या आधीच प्रकृतीच्या कारणावरुन जामीन दिलेला आहे. परंतु प्रकृती अद्यापही पूर्ण ठीक नसल्याच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ (Nawab Maliks Bail) नवाब मलिक यांना दिली आहे. त्यामुळे नबाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार : नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊद इब्राहिम संबंधित दहशतवादी व्यक्तींबरोबर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ठेवला आहे. तसेच कुर्ला येथील जमीन खरेदीमध्ये देखील बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून ठेवला गेला आहे. अनेक महिने ते या आरोपांमुळे तुरुंगात होते. परंतु त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव ते खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका त्यांनी दाखल केली होती. त्या आधारे मागील महिन्यातच त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा या जामिनाच्या मुदतीमध्ये तीन महिन्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने वाढ केली आहे.
वैद्यकीय कारणास्तव जामीन घेण्यासाठी ईडीची हरकत नाही : नवाब मलिक यांच्या वतीनं जोरदार मागणी केली गेली होती की, एक किडनी 100 टक्के खराब झाली. तर दुसरी किडनी 85 टक्के खराब झाली आहे. त्यामुळे जामिनात मुदतवाढ वैद्यकीय आधारावर मिळायला हवी. जामीन हा राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत दिला गेलेला हक्क आहे. यावेळी अंमलबजावणी संचलनालयाकडून वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्यास कोणताही विरोध केला गेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे 3 महिन्यांपुरता हा जामीन नवाब मलिक यांना मंजूर केला आहे. तर जानेवारी 2024 पर्यंत या जामिनाची मुदतवाढ असणार आहे.
हेही वाचा -
Mumbai Crime : नवाब मलिकांच्या मुलाविरुद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
Nawab Malik : अखेर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत