मुंबई - पोंगल हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. तमिळ भाषिकांसाठी शुभदिवस असणारा हा सण आहे. त्यामुळे जगात तमिळ भाषिक लोक राहतात तेथे पोंगल सण साजरा केला जातो. पोंगल सणाच्या पूजा विधीमध्ये ऊसाचे मोठे महत्त्व आहे. पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विक्रीसाठी ऊसाची आवक वाढली आहे. धारावी गांधी मार्केट, प्रतिक्षानगर, अँटॉप हिल, सायन कोळीवाडा भागात विक्रीसाठी ऊस मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
हेही वाचा - वाडिया रुग्णालयाला सरकारकडून ४६ कोटींचा निधी.. बुधवारपासून सर्व सेवा होणार सुरू
पोंगल हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. तमिळर तिरुनाळ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणारा हा सण जगभरातील तमिळ भाषिक लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. यामध्ये प्रामुख्याने भारतातील तामिळनाडू राज्यात आणि भारताबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, यूरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईमध्येही उद्यापासून होत असलेल्या पोंगलच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऊसाची आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'मंत्रालयातील खेटे वाचवा'; रांगेतील नागरिकांची उद्रेकी भावना
मुंबईत येणारा ऊस हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून येतो. पोंगलसाठी व्यापाऱ्यांनी अधिकचा ऊस मागवला आहे. पोंगल सणात मोठ्या प्रमाणात ऊस विक्री होते. वाशी बाजारात 20 ते 25 ऊसाच्या गाड्या आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
पोंगल सणामध्ये ऊसाचे महत्व
दक्षिणेत साजरा केल्या जाणाऱ्या पोंगल सणाला महाराष्ट्रात मकरसंक्रांत असे म्हणले जाते. शेतातील पिकलेले धान्य कापून घरी आणल्यानंतर हा सण साजरा केला जातो. मुंबईत तमिळ बांधव मोठया प्रमाणात राहतात. पोंगल हा सण ३ ते ४ दिवस साजरा करतात. यानिमित्त होणाऱ्या पूजेत ऊसाला महत्त्व असते. पूजेसाठी आणि प्रसादासाठी ऊसाचा वापर करतात.