ETV Bharat / state

'राज्यात 13 टक्के रुग्ण 'ऑक्सिजन'वर! मात्र, प्राणवायू कमी पडू दिला जाणार नाही'

author img

By

Published : Sep 13, 2020, 3:26 PM IST

Updated : Sep 13, 2020, 3:53 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन वितरण आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.

Oxygen plant
ऑक्सिजन प्लांट

मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून आता औषधांबरोबरच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साहजिकच गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून त्यांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. आजच्या घडीला एकूण रुग्णांपैकी 13 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. म्हणजेच राज्यात ऑक्सिजनची गरज वाढली असून ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

राज्यात पुरेसा ऑक्सिजनसाठा आहे मात्र, त्याच्या वितरणात अडथळे येत असल्याने ऑक्सिजनची कमतरता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थितीही लवकरच सुधारेल. कारण आता वितरणातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. राज्यात आठवड्याभरात 14 जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले असून 16 जिल्ह्यात ऑक्सिजन लिक्विड प्लांटचे काम सुरू आहे. हे 16 प्लांट लवकरच सुरू होतील, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

कोरोना हा श्वसनसंस्थेचा आजार असून सध्या तरी यावर कोणताही रामबाण उपाय व औषध नाही. त्यामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 768 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यातील 13 टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. रुग्णवाढीचा अंदाज घेत ऑक्सिजनची आणि ऑक्सिजन बेडची गरज वाढणार आहे, हे आरोग्य विभागाला दोन महिन्यांपूर्वीच समजले होते. त्यादृष्टीने तयारी सुरू केली होती. त्यानुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकेकडून 15-15 दिवसाने रुग्णवाढ, बरे होणारे रुग्ण, गंभीर रुग्ण यांची आकडेवारी जमा करणे सुरू होते. त्यावरून पुढच्या 15 दिवसात तेथे किती रुग्ण वाढतील आणि यातील किती रुग्णांना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन लागेल याचा एक अंदाज काढला जात आहे. या अंदाजानुसार जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना ऑक्सिजन बेड-ऑक्सिजनचा साठा वाढवण्याचे आदेश देणे सुरू आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.

ऑक्सिजनची मागणी या दोन महिन्यात दुपटीने वाढली आहे, हे खरे आहे. मात्र, राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी आहे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे असे नाही. ऑक्सिजनचा पुरेसा साठा राज्यात असून पुढे लागणाऱ्या ऑक्सिजनची तरतूद करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत ऑक्सिजनचे सर्वाधिक मोठे प्लांट आहेत. येथून राज्याच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजन पुरवण्यास विलंब होत आहे. मात्र, आता वितरणातील अडथळेही दूर करण्यात आल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.

येथे आहे ऑक्सिजनची कमतरता -

प्लांट दूर असल्याने काही ठराविक जिल्ह्यात ऑक्सिजनचे वितरण करण्यास विलंब होत आहे. त्यानुसार नागपूर, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, बीड येथे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. तेव्हा या जिल्ह्यात ऑक्सिजनचे वितरण कसे वेळेत करता येईल, याकडेही आता विशेष लक्ष दिल जात आहे, अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली.

Last Updated : Sep 13, 2020, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.