मुंबई - भाजपने सत्ता स्थापनेची जबाबदारी नारायण राणेंवर दिली नाही. राणे बोलले ती चर्चा कोअर कमिटीत झाली नाही. '१४५ आमदार जमवून भाजपा सत्तेत येईल', हे नारायण राणे यांचे वैयक्तिक मत आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले आहे.
हेही वाचा- राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू; जाणून घ्या कलम ३५६
राजकीय घडामोडीवर भाजप लक्ष ठेवून आहे. काही पक्षाच्या नेत्यानी जनादेशाचा अनादर केला. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागली आहे. शेतकरी अवकाळी पावसाचा सामना करत असताना, समस्येचे समाधान व्हावे, जनहीताचे काम करणारं सरकार उभं रहावं, अशी लोकांची इच्छा होती. आम्ही कोणत्याही पर्यायाचा शोध घेतला नाही. पण, आमच्या मित्र पक्षाने पर्ययाचा शोध घेतला. कोणत्याही राजकीय पक्षांनी आज बहुमत सिद्ध केले नाही. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्याऱ्यांनी कसलंही पाठिब्याचे पत्र दिले नाही, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
24 तासापेक्षा जास्त कालावधी हा आम्हाला (भाजपला) देण्यात आलेले नाही. राष्ट्रपती राजवट लागणे हा जनादेशाचा अपमान आहे. काही लोकांनी जो हट्ट केला त्याचा हा परिणाम आहे. भाजप या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आज कोअर कमिटीमध्ये वेट अँड वॉचची भूमिका भाजपने घेतले. शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी भाजपची दारं उघडी आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं. आता शिवसेनेनं दारं, खिडक्या आणि फटीही बंद केल्याचं मुनगंटीवार म्हणाले.