मुंबई - विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार छगनभुजबळ यांनी राज्य कर्जाच्या खाईत सापडलेआहे. राज्यावर५ लाख ३३ हजार कोटींचे कर्ज आणि दरडोई ५० हजार कर्जाचा बोजा झाल्याचे सांगतटीका केली होती. आज अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात उत्तर देत भुजबळांना कॅलक्युलेटर विकत घेऊन दिला पाहिजे, असे सांगत मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सभागृहात खसखस पिकली.
महसूल आणि वन, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजानिक आरोग्य आणि कौशल्यविकासव उद्योजकता विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी भुजबळ यांनीकेली होती. त्याचबरोबर राज्यावर५ लाख ३३ हजार कोटींचे कर्ज आणि दरडोई ५० हजार रुपये कर्जाचा बोजा झाल्याचे सांगत टीका केली होती.
मुनगंटीवार म्हणाले, भुजबळांना कॅलक्युलेटर विकत घेऊन दिला पाहिजे. राज्यावर४ कोटी १६ लाखांचे कर्ज असून ते मर्यादेत असल्याचे सांगितले.