ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या उपकरण पाहिले सूर्यग्रहण

यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण आज भारतीय मानकानुसार सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सुरू झाले. गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज विशिष्ट तयार करण्यात आलेल्या उपकरणातून ग्रहण पाहिले.

mumbai
सूर्यग्रहण
author img

By

Published : Dec 26, 2019, 10:45 AM IST

मुंबई - यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण आज (गुरुवार) भारतीय मानकानुसार सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सुरू झाले. हे ग्रहण पाहण्याकरता लहाणांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गोरेगावच्या अ.भि. गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनीही एकत्र येवून आज सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतला.

mumbai
सूर्यग्रहणाबाबत माहिती घेताना विद्यार्थी

सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील लोक आतूर असतात. वैज्ञानिकांसाठी तर ही पर्वणीच असते. गुरुवारचे सूर्यग्रहण हे २०१९ या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ५८ वर्षांतील सगळ्यात मोठे सूर्यग्रहण असल्याचे म्हटले जात आहे. ग्रहणाबाबतच्या अंधश्रद्धेला फाटा देत हे सूर्यग्रहण पाहण्याकरता नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. गोरेगावच्या अ.भि.गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज विशिष्ट तयार करण्यात आलेल्या उपकरणातून ग्रहण पाहिले. त्यासाठी शाळेत सुर्योत्सव साजरा करण्यात आला. इतकेच नव्हे तर, यासाठी इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून साधने तयार केली होती. या उपकरणातूनच विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण आणि त्यातील प्रकारांची माहिती देण्यात आली. सूर्यग्रहण कसे लागते याच्या माहितीचे पोस्टरही यावेळी लावण्यात आले होते. तसेच ग्रहण बघताना काय काय काळजी घ्यायची असते याबाबत सांगण्यात आले.

सूर्यग्रहणाबाबत सांगताना विद्यार्थी

हेही वाचा - मुंबईकरांना दिलासा; बेकायदा पार्किंगचा दंड झाला कमी

दरम्यान, यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारत, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, सउदी अरब आणि सिंगापूरमधून दिसेल. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. याआधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० ला झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. याआधी 6 जानेवारी आणि 2 जुलैला खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. भारतात सूर्योदयानंतर दक्षिणेकडील भागातून याची कंकणाकृती पाहता येईल. तर, देशातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते. सूर्यग्रहणाचे तसे नसते. ते दिसण्याच्या वेळा स्थानपरत्वे थोड्या प्रमाणात बदलत असतात.

हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे

Intro:मुंबई - गोरेगावच्या अ.भि.गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज ग्रहण विशिष्ट तयार करण्यात आलेल्या साधनेतून पाहिले. त्यासाठी शाळेत सुर्योत्सव साजरा करण्यात आला .यासाठी इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून साधने तयार केली . या साधनांतूनच विद्यार्थी सूर्यग्रहण पाहिले.Body:विझ्युल बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.