ETV Bharat / state

पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही इंटर्नशिप, यूजीसीने जाहीर केल्या सूचना - traditional course internship

देशात आतापर्यंत केवळ अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाच इंटर्नशिप सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांना ही सक्ती नव्हती. मात्र, आता सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांना इंटर्नशिप लागू होणार असून त्यासाठी यूजीसीने विद्यापीठांना अभ्यासक्रमांमधील एक पूर्ण सत्र हे इंटर्नशिपसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यूजीसी
यूजीसी
author img

By

Published : Aug 9, 2020, 1:28 AM IST

मुंबई- पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडे प्रशिक्षण आणि अनुभव नसल्याने त्यांना नोकरीसाठी अडचणी येत होत्या. यामुळे या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. यासाठी आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ही इंटर्नशिप संबंधित महाविद्यालये आणि संस्थांमध्ये न होता कंपन्यांमध्ये केली जाईल. त्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत.

जे विद्यार्थी इंटर्नशिप पूण करतील त्यांना २० टक्के क्रेडीट देण्याच्या सूचना युजीसीने केल्या आहेत. युजीसीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे पारंपारिक अभ्यासक्रमांचा ढाचा बदलणार आहे. देशात आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी आदींसाठी सुरू असलेली इंटर्नशिप आता पारंपारिक अभ्यासक्रमांनाही लागू हेाणार आहे. इतकेच नव्हे तर, इंटर्नशिप ही पारंपारिक अभ्यासक्रमांचा एक भाग होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे यापुढे देशातील बीए, बीकॉम, बीएस्सी या आभ्यासक्रमांबरोबरच इतर पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी आता इंटर्नशिप करावी लागणार आहे.

देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी करीता अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागत असल्याने अनेक कंपन्यांकडून नोकरी देण्यासाठी अडवणूक केली जात होती. यामुळेच या आभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण आणि नोकरीचा अनुभव यावा या उद्देशाने इंटर्नशिप सक्तीचे करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

देशात आतापर्यंत केवळ अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाच इंटर्नशिप सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांना ही सक्ती नव्हती. मात्र, आता सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांना इंटर्नशिप लागू होणार असून त्यासाठी यूजीसीने विद्यापीठांना अभ्यासक्रमांमधील एक पूर्ण सत्र हे इंटर्नशिपसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इंटर्नशिप आणि त्यांच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन केले जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना २० टक्के क्रेडीट दिले जाणार आहे.

हेही वाचा- प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी कॅप्टन दिपक साठे योद्ध्याप्रमाणे लढले: सेवानिवृत्त विंग कमांडर संजीव पै

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.