ETV Bharat / state

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी १५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - संकेतस्थळ

कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१९ च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या अर्जांची प्रिंट काढून ६ मे २०१९ ते १५ मे २०१९ पर्यंत तो अर्ज भरावा.

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी १५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
author img

By

Published : May 5, 2019, 8:01 AM IST

मुंबई - शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत १५ मे पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २०१९ च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या अर्जांची प्रिंट काढून ६ मे २०१९ ते १५ मे २०१९ पर्यंत तो अर्ज भरावा.

विद्यार्थ्यांनी हा अर्ज ते ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. त्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन अर्ज विभागीय मंडळात जमा करावा. या अर्जासोबत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र, सर्व परीक्षांचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबतचे प्रक्रिया शुल्क ४० रुपये, गुणपत्रिका शुल्क १० रुपये असे एकूण ५० रुपयाचे शुल्क रोखीने अथवा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्ष विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांच्या नावे काढण्यात यावेत. संबंधित शाळांनी ६ मे २०१९ ते १६ मे २०१९ या कालावधीत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत.

विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रमाच्या एका कामासाठी २ विषयांचे याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या १ किंवा २ वर्षांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस देण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. तसेच माध्यमिक शाळांनी वेळेत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी.

Intro:ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Body:ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

(विद्यार्थ्यांचे फाईल फुटेल वापरावेत)

मुंबई ता. 4:
2018-19 या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 15 मे पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.
कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च 2019 च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रिंट काढून 6 मे 2019 ते 15 मे 2019 पर्यंत अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी हा अर्ज तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन अर्ज विभागीय मंडळात जमा करावा. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सर्व परीक्षांचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबतचे प्रक्रिया शुल्क 40 रुपये, गुणपत्रिका शुल्क 10 रुपये असे एकूण 50 रुपयाचे शुल्क रोखीने अथवा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांच्या नावे काढण्यात यावेत.संबंधित शाळांनी 6 मे 2019 ते 16 मे 2019 या कालावधीत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत. विदयार्थ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रमाच्या एका कामासाठी दोन विषयांचे याप्रमाणे विदयार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन वर्षांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस देण्यात येतील.शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत तसेच माध्यमिक शाळांनी वेळेत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी.
Conclusion:ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.