ETV Bharat / state

Indian Students in Ukrain : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे आली धावून; विमानतळावर दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षित रेल्वे तिकीट

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात युक्रेनमधून विद्यार्थी दाखल होत आहे. ( Indian Students at Mumbai Airport who came from Ukrain ) मात्र, त्यांच्या पुढचा प्रवासासाठी गैरसोय होऊन नयेत, म्हणून मध्य-पश्चिम रेल्वेकडून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दोन रेल्वे तिकिट खिडक्या सुरू करण्यात येणार आहे. ( Reserved train ticket for Indian Reports )

Students arriving at the mumbai airport will get receive a reserved train ticket
विमानतळावर दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षित रेल्वे तिकीट
author img

By

Published : Mar 2, 2022, 6:59 PM IST

मुंबई - युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ( Indian Students Evacuation from Ukrain ) मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात युक्रेनमधून विद्यार्थी दाखल होत आहे. ( Indian Students at Mumbai Airport who came from Ukrain ) मात्र, त्यांच्या पुढचा प्रवासासाठी गैरसोय होऊन नये म्हणून मध्य-पश्चिम रेल्वेकडून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दोन रेल्वे तिकिट खिडक्या सुरू करण्यात येणार आहे. ( Reserved train ticket for Indian Reports )

आरक्षित तिकीट मिळणार -

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने तेथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. युक्रेनमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. युद्धग्रस्त भूमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी राहतात. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एअर इंडियाचा विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्कची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मुंबई विमान तळावरून आपल्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेकडून दोन रेल्वे तिकिट खिडक्या सुरू करण्यात येणार आहे. या तिकीट खिडक्यांवर विद्यार्थ्यांना आरक्षित तिकीट मिळणार आहेत.

हेही वाचा - Russian radio station : युक्रेनची बातमी देणाऱ्या रशियन रेडियो स्टेशनचे प्रसारण बंद

विद्यार्थ्यांची विशेष काळजी -

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशिया येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरक्षित तिकिट मिळावे, यासाठी विमानतळावर दोन तिकिट खिडक्या खुल्या केल्या जाणार आहेत. यासह अत्यावश्यक माहिती काही अवधी देण्यात देण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई महानगर पालिकेकडूनही युक्रेन आणि रशिया येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांना जेवणाची आणि नाश्ताची सोय केली आहे. विशेष म्हणजे मुंबई राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यत सोडून देण्यासाठी वाहनांची सुद्धा सोय पालिका प्रसनाकडून करण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना कुठलेही बंधन असणार नाही. ज्यांचे झाले नसेल, त्यांची मोफत चाचणी करण्यात येईल. त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. त्यांच्या घरी राहू दिले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.