मुंबई: टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही प्रख्यात आणि दर्जेदार केंद्रीय विद्यापीठ आहे. या ठिकाणी देशभरातून विविध राज्यातील विविध प्रकारचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकायला येतात. यावर्षी होणाऱ्या दीक्षांत समारोहमध्ये एका विद्यार्थिनीला उपस्थित राहण्यास संस्थेच्या प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे. या विद्यार्थिनीने एका प्राध्यापकाविरोधात तिचा लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. याचा परिणाम म्हणून तिला कार्यक्रमात उपस्थित राहण्यात मनाई केल्याचे समजते.
न्याय तर दूरच उलट शिक्षाच मिळाली: माहितीप्रमाणे, पीडित विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर तिलाच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून काढून टाकण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली. त्याला तिने उच्च न्यायालयात आव्हान देखील दिलेले आहे; परंतु वार्षिक दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात तिला उपस्थित राहण्यास मनाई करणे हे अनुचित असल्यामुळेच तिने हा देखील अन्याय असल्यासे म्हटले आहे.
विद्यार्थिनीची प्रतिक्रिया: त्या विद्यार्थ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, माझा लैंगिक छळ केला गेला होता. तिने प्राध्यापकाच्या विरोधात तक्रार केली. म्हणून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एक समिती नेमली होती. त्या समितीने मला प्रतिबंधित करण्याबाबत शिफारस केली होती. तशी प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केली; परंतु मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन त्याला स्थगिती मिळवली. डिसेंबर, 2022 च्या शेवटच्या सत्रामध्ये मला अभ्यास करणे आणि परीक्षा देणे महत्त्वाचे असल्यामुळे तिला न्यायालयाने स्थगिती दिली.
माझा लैंगिक छळ केला होता. प्राध्यापकाच्या विरोधात मी तक्रार केली होती. त्यामुळेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एक समिती नेमली होती. त्या समितीने संस्थेच्या कार्यक्रमाला मला प्रतिबंधित करण्याबाबत शिफारस केली होती. तशी प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केली आहे - पीडित विद्यार्थिनी
टाटा संस्थेची प्रतिक्रिया: टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की, संबंधित विद्यार्थिनीला प्रतिबंधित करण्यासंदर्भातील प्रक्रियाबाबत न्यायालयीन खटला प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाकडून काय आदेश मिळतो, याची ते वाट पाहत आहेत.
संबंधित विद्यार्थिनीला प्रतिबंधित करण्यासंदर्भातील प्रक्रियाबाबत न्यायालयीन खटला प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाकडून काय आदेश मिळतो त्याबाबतची प्रतिक्षा आम्ही करत आहोत - संस्था प्रशासन
काय म्हणाले इतर विद्यार्थी? यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. काही दिवसातच यावर सुनावणी होऊन निकाल येण्याची अपेक्षा आहे. इतर विद्यार्थ्यांनी देखील आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, विद्यार्थिनीने तक्रार केली म्हणून तिला दीक्षांत समारोहामध्ये उपस्थित राहण्याची मनाई केली गेली. मात्र, असे करणे म्हणजे तिच्या मूलभूत हक्कांवर गदा आहे. तर महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे विकास शिंदे यांनी म्हटले आहे की, विद्यार्थिनीचा दोष आहे किंवा नाही हे न्यायालयात सिद्ध होईल; परंतु ती शिक्षण संस्थेमधील विद्यार्थिनी असल्यामुळे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने तिला कार्यक्रमात उपस्थित राहण्यास अनुमती द्यायला हवी.
हेही वाचा: