मुंबई - दक्षिण मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हे वादळ भारताच्या पूर्व मध्य समुद्रतळाशी धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे समुद्रात गेलेल्या मासेमारी करणाऱ्या बोटींना पुन्हा समुद्रकिनारी कोस्टगार्डकडून पाठवले जात आहे. महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षदीप यासारख्या समुद्र परिसरातील मच्छिमारांना कोस्टगार्डकडून वादळाबद्दल सूचना देण्यात येत आहे. त्यांना लवकरात लवकर समुद्रकिनारी पोहोचण्यास सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - आता मराठा समाज आणि संघटनांना एकत्र येण्याची गरज - नारायण राणे
हेही वाचा - रिक्षात बसून दारू पिणाऱ्याला पोलिसांनी दिला चोप; व्हिडिओ जोरदार व्हायरल