मुंबई - गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला, तेव्हा त्याचे पडसाद हे शेअर बाजारात उमटताना दिसले. परंतु या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. तरीही शेअर बाजारात 2020 च्या तुलनेने पडझड कमी स्वरूपात पाहायला मिळाली. तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजाराची सुरुवात मात्र तोट्यात झाली. सेन्सेक्स 61 अंकांनी खाली 48,629 वर बंद झाला. आयटीसीसह 14 स्टॉक्स वधारले. तोट्यात महिंद्रा आणि टीसीएसचा वाटा होता. दुसरीकडे, निफ्टीही 14 अंकांनी खाली 14,681 वर बंद झाला. शेअर मार्केटचा हा ट्रेंड बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय लॉकडाऊन लावल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल -
बाजारात कोरोनाच्या दुसर्या लाटेविषयी चिंता आहे. प्रत्येक विश्लेषक जमिनी वास्तविकतेचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की खरेदी विक्री करण्याच्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. विशेषत: वाहन, सिमेंट, स्टील, कापड, बँकिंग आणि एनबीएफसी या क्षेत्रांमध्ये बँका आणि एनबीएफसीसाठी कर्जदारांची कमतरता असल्याची चर्चा आहे. सिमेंट, स्टील आणि ऑटो क्षेत्रांबाबत त्यांचे मत आहे, की डिलर्स डिलिव्हरी घेणार नाहीत आणि किरकोळ वापर थांबेल. राष्ट्रीय लॉकडाऊन लावल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
अर्थसंकल्पामुळे शेअर मार्केटमध्ये भरभराट पाहायला मिळाली होती-
2021-22 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे शेअर मार्केटमध्ये भरभराट पाहायला मिळाली होती. मात्र, काही दिवसांत कोविडच्य दुसऱ्या लाटेला सुरूवात होतच शेअर बाजारने आलेली तेजी गमावली. शेअर बाजार पुन्हा एकदा बजेटच्या पातळीवर व्यापार करताना दिसला. मार्चच्या मध्यावर साधारणः सेन्सेक्स 49,216 आणि निफ्टी 14557 च्या पातळीवर होता. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 48,600.61 वर होता, तर निफ्टी 14,281 वर होता. एप्रिलच्या मध्यापर्यंत शेअर बाजार 15,000 च्या पातळीवरून 9 वेळा 14300 पर्यंत खाली गेला. हे सर्व खरे आहे, तरीही जोरदार खरेदी होते आहे. त्यामुळे निफ्टी 15,000 पर्यंत पोहोचला होता.
लॉकडाऊनचा परिणाम शेयर मार्केटवर -
मार्च 2020 आणि एप्रिल 2020 मध्येही निफ्टी 7500 पर्यंत खाली आला. त्यानंतर प्रचंड अस्थिरता बघायला मिळाली. विश्लेषकांना सुध्दा या ट्रेण्डमुळे धक्का बसला. यावेळीसुद्धा असे होणे नाकारता येत नाही, कारण दररोज देशभरात कोरोनाचे 3 लाख केसेस मिळत आहेत. ऑक्सिजन, बेड आणि आवश्यक इंजेक्शनची कमतरता आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे काही राज्यांना वाटत आहे. त्यामुळे काही राज्यात लॉक्डाऊन लावला आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'तारक मेहता...'मधील 'बबिता'ला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक