ETV Bharat / state

Aaditya Thackeray : राज्य सरकारचा सध्या टेंडर ट्रान्सफर आणि टाइमपास खेळ सुरू - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

शिंदे सरकारचे सध्या केवळ टेंडर ट्रान्सफर आणि टाइमपास गेम (tender transfer and time pass game) चालू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकार मुंबईला ओरबडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. Latest news from Mumbai

Aditya Thackeray criticized Shinde govt
आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका
author img

By

Published : Nov 18, 2022, 8:13 PM IST

मुंबई : राज्यातल्या सरकारचं सध्या केवळ टेंडर ट्रान्सफर आणि टाइमपास (tender transfer and time pass game) असा खेळ सुरू आहे. मुंबई पालिकेवर सध्या प्रशासकीय कारभार (BMC Administration) आहे. याचाच फायदा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि इतर नेत्यांकडून हा खेळ सुरू असून मुंबईला मुंबईला ओरबाडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर केला आहे. Latest news from Mumbai

खड्डे रातोरात घालवण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच हजार कोटी रुपयांचं टेंडर मुंबईचा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी काढलं होतं. मात्र या टेंडरला प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा या टेंडर साठी रिकॉल द्यावा लागत आहे. पाच हजार कोटी रुपयांचा टेंडर काढून मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे रातोरात घालवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी असं होणं शक्य नाही. कारण केवळ एका रस्त्याचं काम करण्यासाठी 42 परवानग्या काढून 16 संस्थेसोबत मिळून काम करावं लागतं. त्यामुळे संपूर्ण मुंबईच्या रस्त्यावर एकदाच काम करणं शक्य होणार नाही असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लगावला आहे.

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा पैसा नगरसेवकांचा- मुंबईच्या सौंदर्यकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी 1700 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र हा पैसा महापौर आणि नगरसेवकांच्या निधीतून आहे. मात्र सध्या मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकीय कारभार असल्याचा फायदा उचलत मुख्यमंत्र्यांकडून या निधीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातही घोषणा केलेला निधीचा वापर योग्य होत नसल्याचं आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेतून म्हणाले आहेत.

मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी - गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईवर आमचं प्रेम असून मुंबईसाठी आम्ही गेली 25 वर्षे काम करत आहोत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना देखील मुंबईसाठी महत्त्वाच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून मुंबई सुंदर सुंदर करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा नेहमीच राहिला. मात्र आता सत्तेवर असणाऱ्यांसाठी मुंबई हे केवळ सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे मुंबई महानगरपालिकेच्या पैशांवर या सर्वांचा डोळा असल्याचा आरोपही नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सुळसुळाट - राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या अयोग्यरीत्या केल्या जात आहेत काही अधिकाऱ्यांच्या तर 24 तासात दोन दोन बदल्या केल्या जातात. कोणीही आमदार मंत्री पत्र देऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगतात. राज्य सरकार नियमानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्यात करत नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज केला आहे.

शंभर वर्षांपूर्वी कोण चूक कोण बरोबर - राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करताना पाहायला मिळतेय. मात्र यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की शंभर वर्षांपूर्वी नेमकं कोण चूक कोण बरोबर यावर भरण्यापेक्षा भविष्यात काय चूक आहे काय बरोबर आहे यासाठी भांडलं गेलं पाहिजे. तसेच वीर सावरकर यांच्या बाबत आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय याबाबत उद्धव ठाकरे यांनीच पत्रकार परिषदेतून स्पष्ट केला आहे तसेच महाविकास आघाडी याच्या भविष्याबाबत देखील संजय राऊत यांनी वक्तव्य केला आहे त्यामुळे यापेक्षा आपली वेगळी भूमिका नाही असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आपण मंत्री असताना पर्यटन विभागाचा कारभार पारदर्शक - आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना घेतलेले काही निर्णय थांबवण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला आहे यावर बोलताना पर्यटन मंत्री यांनी एमटीडीसी अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता अयोग्यरीत्या भाडेतत्त्वावर दिल्या गेल्या असल्याचा देखील आरोप केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिला आहे. पर्यटन विभागाने कोणतेही काम अयोग्यरीत्या केलेलं नाही जे निर्णय घेतले ते कॅबिनेट बैठकीच्या अंतर्गत घेण्यात आले होते. आताच्या पर्यटनमंत्र्यांना याबाबत काही शंका असल्यास त्याची चौकशी करावी असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.