ETV Bharat / state

राज्याकडून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही - चाहर

शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला काॅंग्रेस जबाबदार आहे. महाराष्ट्रातून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही, असे म्हणत कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर भाजप किसान परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजकुमार चाहर यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Oct 20, 2020, 3:15 PM IST

मुंबई - केंद्राच्या नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होईल. ज्या परिवाराने गांधी नाव लावले त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला काॅंग्रेस जबाबदार आहे. महाराष्ट्रातून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही, असे म्हणत कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर भाजप किसान परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजकुमार चाहर यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली.

चाहर म्हणाले की, त्यांनी ट्रॅक्टर जाळले मात्र भाजपने ट्रॅक्टरची पूजा केली. पंजाबमध्ये राहुल गांधी यांनी रॅली काढली तेव्हा हा कायदा फाडून टाकू असे बोलले होते, त्याचा आम्ही निषेध करतो. काॅंग्रेस थोड्या प्रमाणात आता देशात आहे. काँग्रेस सरकारने स्वामिनाथन आयोगातील एकही शिफारस लागू केली नाही. आम्ही ९८ टक्के स्वामीनाथन आयोगातील गोष्टी लागू केल्या आहेत.

हेही वाचा - मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 7 हजार 392 जणांवर पोलिसांची कारवाई

पुढे चाहर म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांना अजून राज्य सरकारने मदत केलेली नाही. राज्य सरकारने सत्ता स्थापन करण्याअगोदर सांगितले, होत की आम्ही शेतकऱ्यांना मदत करू पण अजून अशी कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. मोदी हे शेतकऱ्यांसोबत कायम आहेत. राज्य सरकारने मदत मागितली तर वेळोवेळी केंद्रातून मदत दिली जाईल. केंद्राने जे दोन शेतकऱ्यांचे कायदे पास केले आहेत. यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही. मोदींनी संपूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात याबाबद्दल त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत, हे पाहण्यात सरकार अपयशी आहे. शेतकऱ्यांना मदत तत्काळ मिळावी, त्याचा पंचनामा करणे काय गरजेचे आहे?. जे नुकसान राज्यात शेतकऱ्यांचे झाले आहे त्याबद्दल 24 तासात राज्य सरकारने मदत केली पाहिजे होती. पण मुख्यमंत्री ज्या प्रकारे दौरा करत आहेत. हे दौरा करायला नव्हता पाहिजे होता. जिल्ह्यातील अधिकारी यांनी मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवले पाहिजे होते आणि लोकांचे नुकसान दिसत आहे, माध्यमांच्याद्वारे देखील दिसत आहे. त्यातून मदत मिळणे आवश्यक होते. पण, शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी असे मुंबईत खासदार जहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा - उत्तर प्रदेश 'क्राइम कॅपिटल'...सुरक्षेबाबत महिला आयोगाचे ताशेरे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.