ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैद्य मद्य विक्रीवर धडक कारवाई

लॉकडाउन काळात राज्यातील मद्य विक्री बंद आहे. या कालावधीत अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे. यात दि.3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण १२२१ गुन्हे नोंद तर एकूण २ कोटी ८२ लाख ३१ हजार १०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क
राज्य उत्पादन शुल्क
author img

By

Published : Apr 4, 2020, 6:50 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाउन काळात राज्यातील मद्य विक्री बंद आहे. या कालावधीत अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे. यात दि.3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण १२२१ गुन्हे नोंद तर एकूण २ कोटी ८२ लाख ३१ हजार १०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३६ वाहने जप्त केली असून ४७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग 24 तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादर, नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ आणि ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे. या क्रमांकावर अवैध मद्यविरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.