ETV Bharat / state

'मुंबईतील रेल्वे सेवा सुरू करा; अन्यथा, सविनय कायदेभंग करावा लागेल'

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा आम्हांला सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला दिला आहे. बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

author img

By

Published : Sep 17, 2020, 3:39 PM IST

मुंबई लोकल
मुंबई लोकल

मुंबई - लोकलसेवा बंद असल्याने दररोज मुंबईत ये-जा करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकल सुरू करण्याचा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. बस-टॅक्सी हळूहळू सर्व सुरू झाले आहे. मात्र, लोकल अभावी सर्वांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे रेल्वे सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला दिला आहे.

  • रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल pic.twitter.com/B0R09IjW22

    — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडिओ ट्वीट करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही. पण, रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का?' असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे. मात्र, लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास लोकांना वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल सेवा लवकर सुरू करा, अशी मागणी सामान्य लोक करत आहेत. त्यातच मनसेने देखील रेल्वे सुरू करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकार सामान्यांनी केलेल्या विनंतीकडे व मनसेच्या इशाऱ्याकडे कसे पाहाते, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

दरम्यान, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहर परिसरात बुधवारी कोरोनाचे 2,352 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 75 हजार 886 वर पोहचला. तर, मृतांचा आकडा 8 हजार 277वर पोहचला. मुंबईमधून बुधवारी 1500 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 35 हजार 566वर गेला आहे. सध्या मुंबईत 31 हजार 678 सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.