मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याची एक क्लिप सध्या सोशस मिडियावर व्हायरस होत आहे. याबात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. स्टॅन्ड अप कॉमेडियन गरिमा जोशूआची ती क्लिप आहे. शुभम मिश्रा या तरुणाने क्पिप पाहून गरिमा जोशूआला बलात्काराची धमकी दिली. त्यामुळे शुभम विरोधात तपास करुन कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर सेलला दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अग्रीमा जोशुआने आक्षेपार्ह वक्तव्य केले. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरस होत आहे. त्यानंतर नेटकाऱ्यांनी अग्रीमा जोशुआवर जोरदार टीका केली होती. गरीमा जोशुआच्या त्या विडीओ संदर्भात कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले होते. यानंतर गरीमा जोशुआने माफी मागितली होती. आणि तो वादग्रस्त व्हिडिओ डिलिट केला.
मात्र, त्यांनतर शुभम मिश्रा या तरुणाने अग्रीमा जोशुआवर संताप व्यक्त करत बलात्काराची धमकी दिली. अभिनेत्री स्वरा भास्करने याबबत त्या तरुणावर कारवाईची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी याची दखल घेत तरुणाविरुद्ध तपास करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.