मुंबई - मुंबई शहराच्या बाहेर राहणाऱ्या मंत्रालय, महानगरपालिका व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या विभाग नियंत्रकांना तसे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पाठवण्यात आले आहे.
एसटीच्या एकूण 50 फेऱ्या होणार असून या सर्व फेऱ्या 21 एप्रिलपासून सुरू होतील. पनवेल ते मंत्रालय, मंत्रालय ते पनवेल प्रत्येकी 3 फेऱ्या, आसनगाव ते मंत्रालय आणि मंत्रालय ते शहापूर प्रत्येकी 2 फेऱ्या, बदलापूर ते मंत्रालय, मंत्रालय ते बदलापूर प्रत्येकी 3 फेऱ्या, मंत्रालय ते डोंबिवली, कल्याण मिरारोड आणि डोंबिवली, कल्याण मिरारोड, ते मंत्रालय या मार्गावर प्रत्येकी 2 फेऱ्या , विरार, पालघर ते मंत्रालय आणि मंत्रालय ते विरार, पालघर प्रत्येकी 3 फेऱ्या, वसई ते मंत्रालय आणि मंत्रालय ते वसई 2 फेऱ्या आणि नालासोपारा ते मंत्रालय, मंत्रालय ते नालासोपारा 3 फेऱ्या प्रत्येकी चालवण्यात येतील. या सर्व फेऱ्या सकाळी व संध्याकाळी घरातून जाताना आणि पुन्हा मंत्रालयातून घरी येण्याच्या वेळेत चालवण्यात येतील.