ETV Bharat / state

Samruddhi Highway : समृध्दी महामार्गावरून नागपूर ते मुंबई बस आज धावणार - ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

एसटी महामंडळाकडून आजपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा सुरू करण्यात येत ( Nagpur Shirdi Samruddhi Highway ready To Use ) आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास जलद गतीने होणार असल्याने, वेळ वाचणार आहे.

Samruddhi Highway
समृध्दी महामार्ग
author img

By

Published : Dec 15, 2022, 10:51 AM IST

मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत ( Nagpur Shirdi Samruddhi Highway ready To Use ) आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचे लोकार्पण केले होते. ह्या मार्ग नागरिकांना प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला ( Nagpur Shirdi First Phase Available To Travel ) आहे.

स्लीपर कोच बससेवा : प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून आज पासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पध्दतीची ३० आसने पुशबॅक पध्दतीची बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने स्लीपर कोच आहेत.

प्रौढांना तिकीटात सवलत : ही बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता शेवटच्या स्थानक ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तासाची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.१३०० व मुलांसाठी रू.६७० इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद मार्गे जालना या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार : ही बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार ( Samruddhi Highway Save Travel Time )आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. ११००व मुलांसाठी रु.५७५ इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार ( Ticket Discount For Adults ) आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.९४५ व मुलांसाठी रु.५०५ इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.