ETV Bharat / state

संसारातून वेळ काढत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 'तिने' 17 वर्षानंतर मिळवले दहावीत यश.! - mumbai city news

सतरा वर्षांपूर्वी सातवीत असताना परिस्थिती आणि कौटुंबिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिले होते. त्यातच लग्न झाले अन् कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. नंतर मुले आणि संसार यांच्यात दिवस उलटू लागले. त्यात शिक्षणाची इच्छा तशीच राहिली. परंतु, ती इच्छा पूर्ण करण्याची जिद्द मात्र सोडली नव्हती.

Visakha Mane Shivdi Mumbai 10th pass
विशाखा माने शिवडी मुंबई
author img

By

Published : Jul 30, 2020, 2:18 AM IST

मुंबई - सतरा वर्षांपूर्वी सातवीत असताना परिस्थिती आणि कौटुंबिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिले होते. त्यातच लग्न झाले अन् कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. नंतर मुले आणि संसार यांच्यात दिवस उलटू लागले. त्यात शिक्षणाची इच्छा तशीच राहिली. परंतु, ती इच्छा पूर्ण करण्याची जिद्द मात्र सोडली नव्हती. घरकाम करत, कुटुंबाचा गाडा हाकत तब्बल १७ वर्षानंतर 'तिने' दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. ही यशोगाथा आहे, विशाखा माने यांची. परळच्या रात्रशाळेत शिक्षण सुरू करत त्यांनी आज 66 टक्केहून अधिक गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.

दहावीत यथ मिळवलेल्या विशाखा माने यांची प्रतिक्रिया...

मंडणगडला असताना सातवीतच विशाखा माने यांचे शिक्षण सुटले होते. आता सतरा वर्षानंतर आपल्या शिक्षणाची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. परळच्या सोशल लिग सर्व्हीस रात्र शाळेतून त्यांनी घवघवीत यश मिळवत शिक्षकांचाही सन्मान वाढवला आहे. विशाखा शिवडी येथील संघ नंबर दोनच्या चाळीत राहतात. त्यांचा एक मुलगा आता सातवीत शिकतोय तर मुलगी तिसरीत असल्याचे त्यांनी सांगितले. तिन-चार घरांचे घरकाम करून आपण तीन वर्षांपासून रात्रशाळेत शिकत होतो. घरी मुलांचा अभ्यास घेता-घेता आपणही अभ्यास करायचो. असे करतच आठवी, नववी आणि आता दहावीत यश मिळाल्याने खूप आनंद झाला असून आपली इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.

हेही वाचा - घरात वडिलांचा मृतदेह असतानाही 'त्याने' दिला पेपर, आज निकाल पाहून आले डोळ्यात पाणी

आपल्याला परळच्या सोशल लिग सर्व्हीस रात्र शाळेतील शिक्षकांनी खूप सहकार्य केले. त्यामुळेच मला हे यश मिळवता आले. तसेच माझ्या पतीचेही मला भरपूर सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सगळ्यांनी सहकार्य केल्यानेच मला १७ वर्षानंतर दहावीत यश मिळवता आले. मी ६६.६० टक्के गुण मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मला खूप शिकायचे असून आपल्या कुटुंबाचा विकास करायचे स्वप्न आपले असल्याचे विशाखा माने यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, परळच्या सोशल लिग सर्व्हीस रात्र शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र घोडके म्हणाले की, विशाखा माने ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली आहे. म्हणुनच तिने दहावीत मोठे यश मिळवले. शाळा आणि आठवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण उपलब्ध करून देते. यासाठी संस्थेचे अध्यक्षआनंद माईन कर, चंद्रकांत खोपडे, आदींचे यात मोलाचे योगदान असल्याचे घोडके यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.