मुंबई : मुंबई सेंट्रल येथून रविवार, मंगळवार व शुक्रवार तर भुसावळ येथून सोमवार बुधवार व शनिवारी सुटेल. भुसावळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गे भरपूर मेल आणि एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जातात. ( Mumbai Central to Bhusawal ) परंतु या मेल आणि एक्सप्रेस ट्रेन जरी चालवल्या जात असेल तरीही मध्य रेल्वेवरील मुंबई ते भुसावळ या भागामध्ये प्रचंड लोक ये जा करतात. भुसावळ हे जंक्शन आहे. भुसावळ पासून जळगाव धुळे सुरत औरंगाबाद अशा तिन्ही मार्गाला जाता येते. त्यामुळे भुसावळ या ठिकाणी मुंबईहून जाणारे हजारो प्रवासी प्रवास करतात.
प्रवास करण्याची संख्या अधिक : भुसावळ रेल्वेच्या जंक्शन असल्यामुळे त्या ठिकाणी हजारो सरकारी कार्यालय आहेत. विविध रेल्वेचे वर्कशॉप आहेत. त्याच्यामुळे सरकारी नोकरदार तसेच खाजगी उद्योजक व्यावसायिक तसेच केंद्र शासनाची ऑर्डनन्स फॅक्टरी, सैन्य दारूगोळा तयार करणारी कारखाने यामुळे देखील तिथे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची येजा असते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवास करण्याची संख्या अधिक आहे. (Central railway) तसेच मुंबईत देखील हजारो प्रवासी जे काम आणि नोकरी उद्योग धंदा निमित्ताने भुसावळ या ठिकाणी जात असतात. त्यांची गर्दी होऊ नये म्हणून ही उपाययोजना केलेली आहे. या सर्व विविध व्यवसाय व नोकरी कामधंदाच्या निमित्ताने प्रवाशांची ये जा अधिक होते. त्याच्यामुळे भुसावळ ते मुंबई सेंट्रल सुमारे 589 किलोमीटर हे अंतर आहे. या अंतरामध्ये अनेक मेल एक्सप्रेस ट्रेन ( Mail Express Train ) चालवल्या जातात. तरीही गर्दी कमी होत नाही, म्हणून आता मुंबई सेंट्रल ते भुसावळ ते पुणे मुंबई सेंट्रल, अशी गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलेला आहे.
या दिवशी मुंबई सेंट सेंट्रल वरून धावणार विशेष गाडी : प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या विशेष ट्रेनच्या संदर्भात आठवड्यापैकी तीन दिवस येण्यासाठी आणि तीन दिवस जाण्यासाठी अशी ही ट्रेन धावणार आहे. मुंबई सेंट्रल येथून रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी ही विशेष गाडी भुसावळ कडे रवाना होईल तर भुसावळ येथून सोमवारी बुधवारी आणि शनिवारी मुंबई सेंट्रल कडे ही विशेष गाडी रवाना होईल.
कोरोना महामारीनंतर अधिकच प्रवाशांची संख्या : यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी आपण वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या सणासुदीच्या निमित्ताने खास ट्रेन चालवतो. यंदा कोरोना महामारीनंतर अधिकच प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल वर्णन सर्व भुसावळ या मध्य रेल्वेच्या मोठ्या जंक्शन रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे लक्षात आले. त्याचे कारण भुसावळ हे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि इतर राज्यांना जोडते. तसेच भुसावळ या जंक्शन रेल्वे स्थानकातून नागपूरकडेही, छत्तीसगडकडेही जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल येथून जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या सोयीसाठी ही गर्दी कमी होण्यासाठी विशेष तीन दिवस जाण्यासाठी व तीन दिवस येण्यासाठी सोय केलेली आहे.