मुंबई : शाळेत जात असणाऱ्या अल्पवयीन मुलीला 'आयटम'(calling minor girl item) म्हणून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण (sexual abuse of minor girl) केल्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने (POSCO court molestation minor girl) आरोपी तरुणाला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' हा शब्द वापरला जातो हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने दिलेल्या निकालात नोंदविले गेले. त्यामुळे आरोपीला 'आयटम' शब्दाचा वापर करून छेड काढणे महागात पडले आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची शिक्षा - अल्पवयीन पीडित मुलीची आरोपीने विनयभंग केल्याची ही घटना 2015 मध्ये घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत एका तरुणाचे तिचा विनयभंग केला. या तरुणाने तिची छेड काढच तिला आयटम असे संबोधले होते. क्या आयटम कहाँ जा रही है? असे आरोपी युवक म्हणाला होता.
आरोपी म्हणतो, माझ्यावरील आरोप चुकीचा - हे प्रकरण न्यायालयात आल्यानंतर त्यावर सुनवणी पार पडली. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायलयाने नोंदवत त्याला दोषी ठरवले. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणी अडकविण्यात आले. या प्रकरणी आपल्याला चुकीच्या आरोपांखाली अडकवले गेल्याचा आरोप आरोपीने केला होता.
न्यायालयाचे मत- एखाद्या मुलीला आयटम असे म्हणून बोलवणे एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही असे म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने 20 ऑक्टोबरला हा निर्णय दिला असून 22 ऑक्टोबरला या संदर्भातील सविस्तर ऑर्डर काढण्यात आली.