ETV Bharat / state

विदेशी गुंतवणुकदारांना विशेष सवलत; उद्योगमंत्री देसाई यांची वेबिनारमध्ये ग्वाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे खेचून आणण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने गुरुवारी काही जाणकारांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत वेबिनारद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकदारांना शासनाच्यावतीने विशेष सवलती व सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.

subhash desai
सुभाष देसाई
author img

By

Published : Jun 12, 2020, 7:53 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे खेचून आणण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने गुरुवारी काही जाणकारांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत वेबिनारद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकदारांना शासनाच्यावतीने विशेष सवलती व सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. या परिसंवादात कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार, मानवी हक्क आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, कंपनी सल्लागार उदय शंकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन उपस्थित होते.

कोविडच्या पार्श्वभूमीवर चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनाझेनची (मेट्रो) स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि खासगी संस्था यांनी एकत्रित काम करावे, असा प्रस्ताव मुळे यांनी मांडला.

नितीन पोतदार म्हणाले की, शासनाने थेट परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. प्रादेशिक विभागनिहाय उद्योगाची वर्गवारी करावी. मुंबई परिसरात चित्रपट-करमणूक, कोकणात अन्न प्रक्रीया उद्योग, औरंगाबादमध्ये अवजड उद्योग, पुणे विभागाता-शिक्षण, नागपूरमध्ये स्टिल आणि खनिकर्म क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत.

कंपनी सल्लागार उदय शंकर म्हणाले की, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राने नवनवीन गोष्टींचा स्वीकार करावा. युरोप, जपानप्रमाणे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने विदेशातील प्रत्येक देशासाठी स्वतंत्र धोरण आखावे. इतर राज्यासोबत तुलना न करता करता एक पाऊल पुढे ठेवून विचार करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.