ETV Bharat / state

बडा दिलवाला : 'या' दाम्पत्यासाठी सोनू सूद बनला 'रिलेशनशिप एक्सपर्ट' - लॉकडाऊन

सोनू सूद लॉकडाऊनमधील प्रवासी मजुरांचा मसीहा बनला आहे. तसेच या लॉकडाऊनने सोनूला रिलेशनशिप गुरुही बनवले आहे.

Sonu Sood
सोनू सूद
author img

By

Published : Jun 8, 2020, 4:45 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले. यादरम्यान या अडकलेल्या मजुरांसाठी देवासारखा धावू आला तो म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद. पडद्यावरचा खलनायक हा खऱ्या आयुष्यातला रिअर हिरो झाला. त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे.

यासह हा अभिनेता लॉकडाऊनमध्ये रिलेशनशिप गुरू म्हणूनही काम करत आहेत. वास्तविक असे घडले की, एक जोडपे घटस्फोटाच्या अगदी जवळ पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी सोनूशी संपर्क साधला. यावेळी सोनूनेही चांगला प्रतिसाद दिला.

ट्विटरवरील एका वापरकर्त्याने सोनूला टॅग केले आणि लिहिले की, 'सोनू सूद, प्रिय सर मी आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे आणि मला हरियाणाच्या रेवाडी येथे माझ्या गावी जायचे आहे. लॉकडाउननंतर बर्‍याच समस्यांमधून जात. पत्नीशी भांडणही होत आहे आणि आता आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया मला गुवाहाटीहून दिल्लीला पाठवा. मी आयुष्यभर तुमचा आभारी राहीन.

या ट्विटला उत्तर देताना सोनूने लिहिले, कृपया भांडण करू नका. मी तुम्हाला वचन देतो की, तुम्हा दोघांना रात्रीच्या जेवणासाठी मी बाहेर घेऊन जाईन. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. परंतु, तुम्ही दोघे एकत्र राहण्याचे वचन द्या, तेव्हाच हे शक्य आहे.

एका अहवालानुसार सोनूने यापूर्वी 21 हजार प्रवासींना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या लोकांसाठीही सोनू काम करत आहे. त्याने सुमारे 28 हजार लोकांना अन्न पुरवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.