ETV Bharat / state

काही पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होणारच - अजित पवार - रश्मी शुक्ला

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैधरीत्या फोन टॅपिंग केली असून यासंदर्भात सर्वच मंत्रिमंडळामध्ये संतापाची लाट आहे. रश्मी शुक्ला यांनी ज्या वेळेस फोन टॅपिंग केले, त्यावेळेसचे गृह विभागाचे सचिव आणि आताचे मुख्य सचिव सिताराम कुंटे या प्रकरणाचा अहवाल तयार करत आहेत. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार,ajit pawar letest news, ajit pawar reaction over phone tapping
अजित पवार
author img

By

Published : Mar 25, 2021, 5:08 PM IST

Updated : Mar 25, 2021, 5:39 PM IST

मुंबई - राज्य सरकारचे डोके दुखी ठरलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि तेव्हाचे गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हा अहवाल तयार करणार आहेत. हा अहवाल लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे दिला जाणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्यामुळे संतप्त -
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैधरीत्या फोन टॅपिंग केली असून यासंदर्भात सर्वच मंत्रिमंडळामध्ये संतापाची लाट आहे. रश्मी शुक्ला यांनी ज्या वेळेस फोन टॅपिंग केले, त्यावेळेसचे गृह विभागाचे सचिव आणि आताचे मुख्य सचिव सिताराम कुंटे या प्रकरणाचा अहवाल तयार करत आहेत. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विरोधी पक्षाने फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारची नाचक्की झाल्याने राज्य सरकारने आता याबाबत कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारवर लावलेल्या आरोपानंतर राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यावर संताप व्यक्त केला आहे.

काही पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होणारच.. अजित पवार
फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती घेतली जाणार -

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग कोणाच्या परवानगीने केली? याचीदेखील आता चौकशी होणार आहे. तसेच हे फोन टॅपिंग कोण कोणत्या नंबरची करण्यात आली. याची पूर्ण माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मागवली आहे. तसेच हे फोन टॅप करण्याआधी रश्मी शुक्ला कोणकोणत्या अधिकाऱ्यांशी बोलल्या होत्या. यासंदर्भातची देखील माहिती सिताराम कुंटे घेत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच हे फोन का टॅप करण्यात आले होते, या मागचा उद्देश काय किंवा हे फोन टॅपिंग करता वेळेस कोणता कट गेला होता का? हे देखील तपासून पाहिले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली -

फोन टॅपिंग प्रकरण आणि परमवीर सिंग यांनी लिहिलेले पत्र तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे. या मुद्द्यांना कशा प्रकारे हाताळायचे, या संदर्भात चर्चा झाली असून या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यायला पाहिजे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

हेही वाचा - वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात पुढे आले मोठे खुलासे

Last Updated : Mar 25, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.