ETV Bharat / state

भारतीयांना सूर्यग्रहण पाहाण्याची संधी, ग्रहण पाहताना घ्या 'ही' काळजी - भारतातून दिसणार सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशावेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

Solar Eclipse in india
भारतातून पाहता येणार सूर्यग्रहण
author img

By

Published : Jun 18, 2020, 10:19 PM IST

मुंबई - 21 जून रोजी भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यामुळे, ग्रहणादरम्यान सूर्याचा 62 टक्के भाग मुंबईमध्ये झाकला जाणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी म्हणजे राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये काही भागात सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल. तर, देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

मुंबईत ग्रहणाची सुरुवात 10 वाजून 49 सेकंदानी होईल. तर, 11 वाजून 37 मिनीट आणि 41 व्या सेकंदाला ग्रहणाची व्याप्ती जास्त दिसेल. 1 वाजून 27 मिनीट 50 व्या सेकंदाला ग्रहणाची अंतिम स्थिती असेल. मुंबईत तीन तास 27 मिनीट आणि 1 सेकंद असा ग्रहणाचा कालावधी असेल. सूर्याची व्याप्ती 62.10 टक्के असेल आणि परिमाण 0.69 असे असेल.

21 जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण मध्य आफ्रिका गणराज्यातून उगवणाऱ्या सूर्यापासून सुरू होऊन पुढे कांगो, इथोपिया, येमन , सौदी अरब, ओमान, पाकीस्तान, भारत, चीन आणि तैवान इथे पाहायला मिळेल. सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागरात संध्याकाळी समाप्त होईल. देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 % भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37% , चेन्नईमध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. कंकणाकृती ग्रहण कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरब,ओमान, पाकिस्तानसह भारत आणि चीनच्या उत्तर भागांमधून दिसेल.

चंद्राच्या सावलीमुळे होणारे खंडग्रासग्रहण आफ्रिका (पश्चिम आणि दक्षिण भाग वगळता), दक्षिण आणि पूर्व युरोप, आशिया (उत्तर आणि पूर्व रशिया वगळता) तसेच ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात काही ठिकाणी दिसेल. सूर्यग्रहण अमावसेच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशावेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

ग्रहण पाहताना घ्या ही काळजी :

उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये

दुर्बिणीतून ग्रहण पाहू नका
सूर्याची दृश्य तीव्रता कमी करणाऱ्या फिल्टरचा उपयोग करू नका
रंगीत पाण्यातून सूर्याचे प्रतिबिंब पाहू नका
ग्रहणादरम्यान सूर्याकडे थांबून थांबून पाहा
खास सूर्यग्रहण पाहण्यासाठी असणारा उच्च दर्जाचा चष्मा वापरा
डार्क वेल्डर ग्लास उपयुक्त आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.