ETV Bharat / state

Medha Patkar : मेधा पाटकरांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर, म्हणाल्या, अदानींसारख्या... - Social Worker Medha Patkar

नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ( Social Worker Medha Patkars ) यांनी मागील आठवड्यात भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या सहभागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये निवडणुकीच्या मिरवणुकीत मेधा पाटकर आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. या टीकेला मेधा पाटकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 22, 2022, 7:08 PM IST

मुंबई : 'नफरत छोडो संविधान बचाओ' या अभियानाद्वारे देशातील अनेक प्रगतिशील संस्था संघटना आणि राजकीय नेते कार्यकर्ते एकत्र येत 'भारत जोडो'च्या आधीपासून त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. आणि भारत जोडो मोहीम याला देखील या नफरत छोडो संविधान बचाव अभियानाने समर्थन दिले. सक्रिय पाठिंबा दिला आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय संघटनेच्या नेत्या मेधा पाटकर देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या. या सहभागावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी मेधा पाटकरांवर टीका केली तर आता त्या टीकेला मेधा पाटकर यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे.

मोदींची मेधा पाटकारांवर टीका - नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ( Social Worker Medha Patkars ) यांनी मागील आठवड्यात भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या सहभागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये निवडणुकीच्या मिरवणुकीत मेधा पाटकर आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मोदी जाहीर सभेत संबोधन करताना म्हणाले, 'मेघा पाटकर यांनी गेल्या तीन दशकापासून नर्मादा नदीवर बांधण्यात येणाऱ्या सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प करण्यास उशीर झाला. त्यामुळेच कच्छ या भागाला पाणी मिळू शकले नाही.'' असे म्हणत मेधा पाटकर यांच्यावर टीका केली होती. परंतु मेधा पाटकर यांनी मोदींना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या टीकेला मेधा पाटकर यांचे प्रत्युत्तर

मेधा पाटकर यांची पंतप्रधांनावर टीका - मेधा पाटकर म्हणाल्या की, ''आमचा संविधानावर विश्वास आहे. तसेच देशामध्ये जात, संप्रदाय व धर्म यांच्या आधारावर माणसांमध्ये भेदभाव करण्याला विरोध आहे. मात्र संविधानाचा विचार घेऊन पदयात्रेमध्ये सामील होण्याबाबत मोदी घाबरले की काय असे आम्हाला वाटत आहे. तसेच गुजरातमधील येत्या निवडणुकींमध्ये भाजपापेक्षा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनाच अधिक मतदान होईल. या भीतीने ते राहुल गांधी तसेच काँग्रेस आणि आमच्यासारख्यांवर आता खोट्या माहितीच्या आधारे टीका करू लागलेले आहेत. मोदी यांचे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद देखील आहे. ज्या संविधानाच्या समता, न्याय आणि लोकशाही मुलांच्या आधारेच 50 हजार पेक्षा अधिक विस्थापितांची लढाई आम्ही अहिंसेने शांतीने लढलो. त्यानंतर आम्हाला त्याबाबतीत काही एक न्याय मिळाला.''आमच्यासारख्यांना विकास विरोधी ठरवणे म्हणजे हे विकृत पद्धतीचे विश्लेषण त्यांनी केले असल्याचा टीका मेधा पाटकर यांनी केलेली आहे.

अदानी कंपनीला पाणी दिले - मोदींनी केलेल्या आरोपावर त्या म्हणाल्या की, '' विकास प्रकल्प राबवता मात्र पुनर्वसन करत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने चार वर्ष सरदार सर्व प्रकल्प रोखून धरला होता. कच्छ या भागात तेथील शेतकऱ्यांना आणि जनतेला पाणी मिळाले नाही कारण नरेंद्र मोदी हेच आहे. त्यांनी कच्छ या ठिकाणी पाटाचे जाळे जे विकसित करायला पाहिजे ते केलेच नाही. जनतेला पाणी द्यायचे सोडून अदानी कंपनीला कोकोकोला यांना पाणी दिले. त्याचे कारण आमच्या माथी फोडतात . जनेतला पाणी का मिळाले नाही ही बाब भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे गुजरातची जनता ही पाणी न मिळाल्यामुळे त्रस्त आहे. तसेच नर्मदाच्या प्रकल्पाच्या नावाने दिलेले खोटे आश्वासन देखील पूर्ण करू शकले नाही. हे सुद्धा गुजरात मधील जनतेला माहित आहे. म्हणूनच या सर्व गोष्टींना विसरून जाण्यासाठी मोदी या प्रकारे टीका करीत असल्याचे मेधा पाटकर यांनी म्हटलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.