मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी (१२ मे) मतदान होत आहे. या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सहाव्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत असून, यामध्ये ४४ जागा भाजपकडे आहेत. या जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपूढे असणार आहे.
या ठिकाणी होणार मतदान
१) बिहार - 8
२) हरियाणा - 10
३) झारखंड - ४
४) मध्यप्रदेश - 8
५) उत्तर प्रदेश - 14
६) पश्चिम बंगाल - 8
७) दिल्ली - 7
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेससमोर भाजपने आव्हान निर्माण केले आहे. यामध्ये भोपाळ मतदारसंघातील लढत ही अत्यंत अतितटीची मानली जात आहे. येथे काँग्रसेचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची लढत मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी होणार आहे. तर गुणा मतदारसंघात काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंदिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.