ETV Bharat / state

Sanjay Kute Statament : संजय कुटेंचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, माधुरी मिसाळ यांना एक दिवसासाठी मंत्रीपदाचा....

author img

By

Published : Mar 8, 2023, 8:35 PM IST

राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांना जर महिला बाल विकास खात्यात रस नसेल तर त्यांनी किमान एक दिवस तरी माधुरी मिसाळ यांना मंत्रीपदाचा प्रभार द्यायला पाहिजे होता, अशा शब्दात भाजप आमदार संजय कुटे यांनी मंगल प्रभात लोढा यांना घरचा आहेर दिला.

Sanjay Kute Statament
संजय कुटे

मुंबई : महिला धोरणाच्या संदर्भात प्रस्ताव विधानसभेत मांडला गेल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी सर्व महिला आमदार सहभागी झाल्या. मात्र यावेळी आमदार सभागृहात आपली मते मांडत असताना महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा सभागृहात उपस्थित नव्हते.

सभागृहांन नोंद घ्यावी : महिला आमदार आपले प्रश्न मांडत असताना राज्याच्या महिला धोरणावर आपले विचार व्यक्त करत असताना ते गांभीर्याने नोंदवून घेतले गेले पाहिजेत. मात्र, सरकार पक्षाकडून महिला आणि बालविकास मंत्री उपस्थित नसल्याबाबत आमदार वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. तर किमान सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी तरी गांभीर्याने चर्चा ऐकायला पाहिजे, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले संजय कुंटे : वर्षा गायकवाड यांच्या विनंती नंतरही महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी तीव्रनापसंती दर्शवली. जर मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आजच्या दिवशी उपस्थित राहणे शक्य नव्हते त्यांना या खात्यात रस नसेल तर त्यांनी किमान आजचा दिवस तरी या खात्याचा प्रभार आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवायला हवा होता अशा शब्दात कुटे यांनी लोढा यांना घरचा आहेर दिला.

मंत्री लोढ यांची दिलगिरी : महिला व बालविकासमंत्री प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती देताना आपण राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यामुळे सभागृहात उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.

अर्थसंकल्प होणार सादर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (9 मार्च) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आर्थिक धोरण सभागृहात सादर केले. यामुळे राज्याची सध्या आर्थिक स्थिती काय आहे, ते स्पष्ट झाले. राज्याच्या अर्थसंकल्पात काय नवी धोरणे मांडली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray in Budget Sessions : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.