ETV Bharat / state

Mumbai Fire: साकीनाक्यात पहाटे अग्नितांडव; आगीत दोघांचा मृत्यू - साकीनाका हा झोपडपट्टी असलेला परिसर

साकीनाका परिसरामध्ये एका दुकानाला आग लागली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा आग भडकली. आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. साकीनाका हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीमध्ये दोन ते तीन जण अडकले होते. त्यापैकी राकेश गुप्ता २२ वर्ष याचा रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू झाला आता. गणेश देवशी या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Fire
आगीत दोन दुकाने जळून खाक
author img

By

Published : Mar 27, 2023, 8:04 AM IST

Updated : Mar 27, 2023, 2:28 PM IST

साकीनाक्यात पहाटे अग्नितांडव

मुंबई : साकीनाका परिसरामध्ये आज पहाटे अग्नितांडव पाहायला मिळाले. साकीनाका हा झोपडपट्टी असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने झोपडपट्टी आहे. या ठिकाणच्या एका हार्डवेयरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. सर्व झोपेत असतानाच आग लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी पोहचले. त्यांनी सुमारे अर्धा तास आगीशी झुंज देवून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवल्यानंतर अग्निशमन दल गेल्यावर पुन्हा आग लागली.

आग 'का' लागली याची चौकशी : पुन्हा एकदा अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये दोघेजण मृत्युमुखी पडले, परंतु वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आग का लागली? याची चौकशी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केली जात आहे. आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

दोघांचा मृत्यू : साकिनाका येथील आगीत ४० बाय ५० चौरस फुटाच्या जागेत हार्डवेअर दुकानामधील सर्व सामान जळून खाक झाले आहे. हे दुकान तळ अधिक एक मजली होते. या आगीत दोन ते तीन जण अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. दुकानाच्या पुढील भाग तोडण्यात येवून अग्निशमन दलाने आत प्रवेश करून एका व्यक्तीला बाहेर काढले. त्याला राजावाडी रुग्णालयात पाठवले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या आगीत गणेश देवशी व राकेश गुप्ता या दोन व्यक्तींचा मृत्यु झाला आहे.

कांजूरमार्ग आगीत पाच जण जखमी : कांजूरमार्ग पूर्व येथील म्हाडा कॉलनी पी २ या इमारतीला काल आग लागली होती. या आगीमध्ये इलेक्ट्रिक कॅबिन, मीटर बॉक्स तसेच वायरिंग जळून खाक झाली. या आगीमध्ये विमल जालिंदर, अलका सकटे, नताशा सकटे, अंजली मावलनकर, करुणा उबाळे हे पाच जण जखमी झाले. त्यांना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Fire in Kanpur Dehat : झोपडीला लागली आग, झोपेतच एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated : Mar 27, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.