ETV Bharat / state

कोरोना धास्ती : पवईत किराणा दुकानासमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी चौकोन, तर घाटकोपरमध्ये निर्जंतुकीकरण

author img

By

Published : Mar 25, 2020, 2:20 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवा कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. मात्र, सर्व बंद झाले तर किराणा व अन्न, धान्य आपल्याला मिळणार नाही या भीतीने नागरिकांच्या मनावर दडपण येत आहे. यामुळे नागरिक लॉकडाउन व संचारबंदी असतानाही घराबाहेर पडून गर्दी करीत आहेत.

corona effect  corona update  कोरोना अपडेट  कोरोना महाराष्ट्र  कोरोना भारत  पवई मुंबई कोरोना न्युज
कोरोना धास्ती : पवईत किराणा दुकानासमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी रेषा, तर घाटकोपरमध्ये निर्जंतुकीकरण

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारच्यावतीने विविध उपाय आणि जनजागृती केली जात आहे. यातच घाटकोपरच्या पंतनगर येथे अग्निशमन दलाच्या जवानांनी जंतुनाशक फवारणी केली, तर पवई येथे किराणा माल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच त्यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी दुकानासमोर रेषा मारण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक कडक निर्बंध अंमलात आणत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवा कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. मात्र, सर्व बंद झाले तर किराणा व अन्न, धान्य आपल्याला मिळणार नाही या भीतीने नागरिकांच्या मनावर दडपण येत आहे. यामुळे नागरिक लॉकडाउन व संचारबंदी असतानाही घराबाहेर पडून गर्दी करीत आहेत. त्यासाठी पवईतील मोरारजी नगर येथील एका दुकानदाराने एक शक्कल लढवली आहे.

दुकानदाराने दुकानसमोर चुन्याच्या सहाय्याने एक मीटर अंतरावर चौकोन तयार केले आणि त्याप्रमाणे त्यांना अत्यावश्यक सामान वितरित केले जात आहे. दुसरीकडे घाटकोपरच्या पंतनगरमध्ये गर्दीचे ठिकाणी फेरीवाले व भाजीपाला विक्रेते बसतात. याठिकाणी अग्निशमक दलाच्यावतीने निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.