मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही शिवसेना-भाजपमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने मुख्यमंत्रिपद पारड्यात पाडून घेण्याची शिवसैनिकांची मागणी आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची शिवसेनेची मागणी भाजपने फेटाळून लावली आहे. तर आता भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार आहेत. त्यानंतर ते शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवणार आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि काही मंत्रीपद वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर आता शिवसेना भाजपचा हा प्रस्ताव मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, एकंदरीत शिवसेनेचे मागील काळातील भूमिका पाहता शिवसेना 'घालीन लोटांगण' करत सत्तेमध्ये सहभागी होईल, असे निरीक्षण वरिष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
हेही वाचा - घटकपक्षांना हवी ४ मंत्रीपदे, भाजप-सेनेत आठवले करणार मध्यस्थी
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपने सर्वाधिक 122 जागा जिंकल्या होत्या. आणि याच्याबळावर मुख्यमंत्री बनवला होता. राष्ट्रवादीच्या सुरुवातीला पाठिंबा घेत 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. भाजप सरकारमध्ये सुरुवातीला शिवसेना सहभागी झाली नव्हती. मात्र, काही काळानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाले. 2019 मध्ये चित्र वेगळे होते. शिवसेना-भाजप महायुती म्हणून एकत्र आले.
त्यात भाजपला 105 जागा तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. मात्र, किंग मेकर असलेल्या शिवसेना शिवसेना चर्चा सुरू झालेली नाही. दोन्ही पक्षाचे नेते स्वतंत्र राज्यपालांना भेटले. त्यामुळे पक्षाकडून स्वबळावर स्थापनेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, 31 ऑक्टोबरचा मुहूर्त चुकला आहे आणि आता सत्ता स्थापन कधी होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.