ETV Bharat / state

Shivsena UBT anniversary : 'इथे गर्दी तर तिथे गारदी' उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, भाजपची राज्य करण्याची लायकी नसल्याचा घणाघात - भाजपची राज्य करण्याची लायकी नसल्याचा घणाघात

शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. आज दोन्ही शिवसेना, वर्धापन दिनाचा कार्यक्रम करत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले 57 वर्षापूर्वीचा उत्साह अजूनही कायम आहे. षण्मुखानंद हॉल खच्चून भरलाय, कुणी उठून जात नाही. इथे गर्दी तर तिथे गारदी आहेत असा टोला ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला लावला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 19, 2023, 8:57 PM IST

मुंबई - मणिपूर पेटलंय तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत. तिथे एका मंत्र्याचे घर पेटवले जाते, तिथे कुणी लक्ष देत नाही. आज देशात हिंदू आक्रोश सुरू आहे. काँग्रेसच्या काळात 'इस्लाम धोको में' असे म्हटले जात होते. आता 'हिंदुत्व धोके में है' असे म्हटले जाते. आता सांगा खरे हिंदुत्ववादी कोण, असा सवाल करुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. आज दोन्ही शिवसेना, वर्धापन दिनाचा कार्यक्रम करत आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले 57 वर्षापूर्वीचा उत्साह अजूनही कायम आहे. षण्मुखानंद हॉल खच्चून भरलाय, कुणी उठून जात नाही. इथे गर्दी तिथे गारदी आहेत असा टोला ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला लावला. ही कडवट शिवसैनिकांची गर्दी आहे, असे ठाकरे म्हणाले.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांना छळायचा आनंद ही विकृती सत्ताधाऱ्यांच्यात आली आहे. तिकडे मणिपूर पेटलंय. मात्र इकडे पंतप्रधान अमेरिकेला जात आहेत. मोदींवर टीका केल्यानंतर कालच कुणीतरी भाजपचे टीका करताना म्हटले की सूर्यावर थुंकू नका. मग हा सूर्य न मणिपूरमध्ये का उगवत नाही. तिथे एवढा हिंसाचार सुरू आहे. तिथे मोदी का जात नाहीत. ते अमेरिकेला का जात आहेत. मणिपूरची परिस्थिती पाहिली तर लिबियासारखी परिस्थिती भारतात निर्माण होईल असे लष्कराच्या लेफ्टनंट जनरलने म्हटले आहे. मंत्र्यांची घरे तिकडे जाळली जात आहेत. लोक सुरक्षित नाहीत त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी यांचे दौरे सुरू आहेत हे देशहिताचे नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

राजकारणात हास्य जत्रेचे प्रयोग सादर होत असतात, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीसांनी हास्य जत्रेचा प्रयोग काल सादर केला. ठाकरे यांनी यावेळी फडणवीसांचा व्हिडिओ लावला. त्यामध्ये फडणवीस म्हणत आहेत की, कोविडची व्हॅक्सिन मोदीजींनी तयार केली. यावर सगळ्या सभागृहात हशा पिकला. पुढे ठाकरे म्हणाले की, कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय कळतच नाही. जर यांनी व्हॅक्सिन तयार केले, तर की बाकीचे काय गवत उपटत बसले होते. भारत बायोटेक, सिरम यांनी काय केले. असे सगळे अंधभक्त आहेत. खरे तर आता यांनाच वॅक्सीन देण्याची गरज आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

  • शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन! Livehttps://t.co/o94eqf2sGS

    — ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचीही स्तुती केली. त्यांनी राहुल गांधी यांना उद्घृत करुन सांगितले की, लस जर हे बनवत असतील तर ब्रह्मांड कसे चालवायचे ते ब्रह्मालाही हे शिकवतील. आता या सगळ्यांना समुदेशनासाठी पाठवले पाहिजे. हल्ली विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी यांचा उपयोग केला जात आहे. तिकडे चीन पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. इथे पक्ष संपवण्यापेक्षा जर हिंमत असेल तर देशाचे शत्रू संपवा, असे आव्हान त्यांनी मोदीना दिले. जर देशात हिंदू असुरक्षित असतील. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत असेल तर तुमच्यात राज्य करायची लायकी नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. अमित शहांना महाराष्ट्रात यावे लागते. उद्धव ठाकरेंचा जप करावा लागतो. ते सोडून रामाचा जप करा काही पुण्य मिळेल, असा टोला यावेळी अमित शाह यांना ठाकरे यांना लावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.