ETV Bharat / state

'राष्ट्रपती राजवट लागू करायला राष्ट्रपती कोणाच्या खिशातले आहेत का?' - महाराष्ट्र सत्ता स्थापन

विरोधकांना भीती घालण्यासाठी तपास यंत्रणेचे दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, आता त्यांनंतरही भीती दाखवण्यासाठी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार काढले का? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालवू नका, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.

खासदार संजय राऊत
author img

By

Published : Nov 2, 2019, 12:12 PM IST

Updated : Nov 2, 2019, 12:28 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेने युतीला महाजनादेश दिला आहे. मात्र, राज्यातील एखादा मंत्री १५ दिवसात राज्यात राष्ट्रपती राजवटीची भाषा करीत असेल, तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. लोकशाही मानणाऱ्या नेत्यांना ही भाषा शोभून दिसत नाही. राष्ट्रपती काही कोणाच्या खिशात नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

'राष्ट्रपती राजवट लागू करायला राष्ट्रपती कोणाच्या खिशातले आहेत का?'

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब होत आहे. यावर नुकतेचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे म्हटले होते. त्यावरच संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी उशिर होत आहे. मात्र, हा पहिलाच प्रसंग नसून भाजपशासित राज्यात असे प्रकार अनेकवेळा झालेले आहेत. कायदा, संसदीय लोकशाही, नियम सर्व आम्हालाही कळतात. गेल्या ५५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राजकारण करीत आहे, असे राऊत म्हणाले.

विरोधकांना भीती घालण्यासाठी तपास यंत्रणेचे दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, आता त्यांनंतरही भीती दाखवण्यासाठी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार काढले का? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालवू नका, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.

सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे १४५ आमदारांची बहुमताची यादी असेल तोच स्थिर सरकार देणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Intro:राष्ट्रपती हे काय कोणाच्या खिशात आहेत. का राजकारण आम्हालाही कळते ..संजय राऊत शिवसेना नेते

राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेना पक्षाकडून जो विलंब होत आहे यावर नुकतेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन नाही झाली तर राष्ट्रपती राजवट राज्यात लागू होईल असे म्हटले यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवटवर भाषेवर जोरदार टीका केलीBody:राष्ट्रपती हे काय कोणाच्या खिशात आहेत. का राजकारण आम्हालाही कळते ..संजय राऊत शिवसेना नेते

राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेना पक्षाकडून जो विलंब होत आहे यावर नुकतेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन नाही झाली तर राष्ट्रपती राजवट राज्यात लागू होईल असे म्हटले यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवटवर भाषेवर जोरदार टीका केली.

देशातील एखाद्या मोठ्या राज्यात महाराष्ट्रासारख्या निवडणुकीतून जनतेनी महाजनादेश दिला असताना राज्यात राजकारण, समाजकारण करते वेळी राज्यातील निकालानंतर एखादा मंत्री जर पंधरा दिवसात राज्यात राष्ट्रपती राजवटीची भाषा करीत असेल तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. असे संजय राऊत म्हणाले

सरकार स्थापनेला विलंब का होतो या प्रश्नाला उतर देताना राऊत म्हणाले महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी उशीर होत आहे. तो हा पहिलाच प्रसंग नसून देशात भाजपशासित राज्यांत असे अनेक वेळा प्रकार झालेले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची भाषा लोकशाही मानणार्‍या महाराष्ट्रातील नेत्यांना शोभून दिसत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रपती हे काय कोणाच्या खिशात नसून ती एक प्रमुख संस्था आहे. कायदा, संसदीय लोकशाही नियम सर्व आम्हालाही कळतात आम्ही 55 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शना नंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राज्यात देशात राजकारण करते त्यामुळे राष्ट्रपती शासनाची भाषा करणाऱ्यांनी हे शोभत नसल्याचे उनरुचार संजय राऊत यांनी काढले ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणेचा दबाव वापरानंतर ही जर विरोधी लोकांना भीती करीता राष्ट्रपतीचे हत्यार काढले का असंच आता आम्हाला दुर्दैवाने म्हणावे लागेल असे संजय राऊत म्हणाले कृपा करून राष्ट्रपतीना या गोंधळात ओढून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका असे संजय राऊत म्हणाले

भाजप कडून सरकार स्थापन करन्यासाठी जोरदार तयारी चालू असून शिवसेना त्यात सामील होईल का यावर राऊत म्हणाले त्याचे स्वागत आहे. पण शेवटी बहुमताचा मुहूर्त महत्त्वाचा आहे ज्यांच्याकडे 145 आमदारांची बहुमताची यादी असेल तोच स्थिर सरकार देणार आहे असे संजय राऊत म्हणाले.Conclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.