ETV Bharat / state

निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? राऊत यांचा केंद्राला सवाल

देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावे हे योग्य नाही. हीच लोकं मग देशभरात जाऊन कोरोनाचा अधिक फैलाव करतील. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

author img

By

Published : Apr 27, 2021, 3:37 PM IST

Sanjay raut
संजय राऊत

मुंबई - मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दांत फटकारले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला फटकारले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावे हे योग्य नाही. हेच लोक मग देशभरात जाऊन कोरोनाचा अधिक फैलाव करतील. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र -

राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असंही राऊत म्हणाले.

मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील -

देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना फैलावला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला, असे आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय, असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुक आयुक्तांना राज्यपाल करणार?

कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे, हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे न्यायालय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.