ETV Bharat / state

'राम मंदिराचे राजकारण संपवा; वर्गणी गोळा करणे म्हणजे कार सेवकांचा अपमान'

राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येणार आहे. त्याप्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी रामाच्या मंदिरावर राजकारण होऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. तसेच वर्गणी गोळा करून मंदिर बांधणे किंवा त्या आडून प्रचार करणे म्हणजे राम मंदिरासाठी रक्त सांडणाऱ्या कारसेवकांचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Dec 21, 2020, 11:36 AM IST

Updated : Dec 21, 2020, 12:33 PM IST

मुंबई - राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक देशभरात जाऊन वर्गणी गोळा करणार आहेत. मात्र, राम मंदिराच्या नावाने सुरू असलेल्या या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तसेच राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवा. राजकारणाच्या हेतूने जे प्रकार सुरू आहे, त्या माध्यमातून प्रभू रामाचा आणि त्या मंदिरासाठी रक्त सांडलेल्या कारसेवकांचा अपमान होत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

'राम मंदिराचे राजकारण संपवा

राजकारणातून राम मंदिराचा मुद्दा दूर जायला हवा-

शिवसेनेचे मुख पत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या प्रकरणाचा समाचार घेण्यात आला आहे. या माध्ममातून २०२०४ च्या निवडणुकीचा प्रचार राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी सामनातून केला आहे. यावर त्यांना विचारणा केली असता, राऊत म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर जायला हवा. राम मंदिराचे राजकारण केव्हा तरी संपावे, त्या मंदिराच्या बांधकामासाठी भूमीपूजन सुरू झाले आहे. या मंदिरासाठी हजारोंचे हौतात्म्य झाले आहे. शिवसेनेने अनेक वेळा आंदोलन केले आहे.

हा तर रामाचा अपमान-

आयोध्याच्या राजाला हे मान्य नाही. राजकीय प्रचारासाठी हे जे काही चाललंय हा रामाचा अपमान आहे. घरोघरी वर्गणी गोळा करणे हे लोकांना मान्य नाही. रामल्ललाच्या नावाने जे आयोध्यात बॅंक खातं ऊघडलंय त्यात अनेक दानशुरांनी पैसे टाकले. राम मंदिर निर्मितीसाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी जगभरातील हिंदूनी या आधीच तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य होणार आहे. शिवसेनेनेही या मंदिरासाठी एक कोटी निधी दिला आहे. मग असे असताना हे चार लाख लोक घरोघरी जाऊन वर्गणी मागण्याचे राजकारण कशासाठी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राजकारणात अशी स्पर्धा होत असते-

गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये भव्य रोड शो केला. त्या रोडशोला जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्याबाबत संजय राऊतांना विचारणा केली असता, अमित शाह आणि ममता बॅनर्जी हे आमने सामने येत आहे, लढत आहे त्यांना लढू द्या, लोकशाही आहे. लोकशाहीत हे होतच, राजकारणात दोन पक्ष असतात. त्यामध्ये जिंकण्यासाठी अशा स्पर्धा होत असतात. मात्र मला वाटते आजही ममता बॅनर्जी यांना माननारे लोक आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Last Updated : Dec 21, 2020, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.