ETV Bharat / state

शिवसेनेकडून अरविंद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब, मोदींच्या शपथविधीसोहळ्यात घेणार मंत्रीपदाची शपथ - खासदार अरविंद सावंत

नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये एनडीच्या प्रत्येक घटकपक्षातील फक्त एका खासदाराला मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेनेने त्यांच्या मंत्र्यांचे नाव घोषीत केले आहे.

अरविंद सावंत
author img

By

Published : May 30, 2019, 10:54 AM IST

Updated : May 30, 2019, 12:18 PM IST

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री मंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये एनडीच्या प्रत्येक घटकपक्षातील फक्त एका खासदाराला मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेनेने त्यांच्या मंत्र्यांचे नाव घोषीत केले आहे.

शिवसेनेचे १७व्या लोकसभेत १८ खासदार निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेकडून लोकसभेत सर्वाधिकवेळा निवडून येण्याचा मान यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील खासदार भावना गवळी यांना जातो. १७व्या लोकसभेत त्या शिवसेनेच्या सर्वाधिक ज्येष्ठ खासदार म्हणून ओळखल्या जातील. लोकसभेचा सर्वाधिक अनुभव असलेल्या गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभूत करून गवळी यांनी सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे यंदा त्यांना मंत्रीपद देऊन शिवसेना त्यांचा योग्य सन्मान करणार अशी आशा यवतमाळ-वाशिमच्या शिवसैनिकांना होती. मात्र, पक्षनेतृत्वाने मुंबईतील खासदार सावंत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

गेल्यावेळी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये अनंत गीते यांनी शिवसेनेचे मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव केला. त्यामुळे आता अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोण आहेत अरविंद सावंत?

अरविंद सावंत हे सुरुवातीला टेलीफोन नेटवर्क लिमिटेड (एमटीएनएल)मध्ये इंजीनिअर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सावंत महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी एमटीएनएलमधून सेवानिवृत्ती घेतली. तसेच ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत.

अरविंद सावंत मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांना मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. यंदाही त्यांनी देवरा यांचा पराभव करीत दक्षिण मुंबईचा गड राखला.

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : May 30, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.