ETV Bharat / state

sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून बदनामीचे राजकारण - उदय सामंत

पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबरोबरचा फोटो ट्विट करून, संजय राऊत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंबेरकर यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही, नेत्यांसोबत अनेक जण असे फोटो काढतात, हा फोटो जुना आहे. असा दावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. राऊत यांनी आंबेरकर याच्यासोबतचा सामंत यांचा फोटो ट्विट केल्याने ते संतापले आहेत.

Uday Samantha
संजय राऊत यांच्याकडून बदनामीचे राजकारण
author img

By

Published : Feb 11, 2023, 2:25 PM IST

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत पंढरीनाथ आंबेडकर यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणी उदय सामंत यांची ही चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटला पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ही आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

तो फोटो जुना आहे: संजय राऊत यांनी ट्विट केलेला फोटो हा जुना फोटो आहे. एखाद्या कार्यक्रमात पंढरीनाथ आंबेडकर यांच्यासोबत आपला फोटो असू शकतो. असे अनेक जण सोबत फोटो काढतात पण त्यामुळे काही त्यांच्या कृत्यांमध्ये संबंधित नेत्याचा संबंध असू शकत नाही. अथवा समर्थन असू शकत नाही. त्यामुळे संजय राऊत हे जाणून बुजून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. रिफायनरीच्या संदर्भात लोकभावना असू शकतात त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु त्यासाठी विरोध म्हणून एखाद्या पत्रकाराला संपवावे असा कुणीही प्रयत्न करणार नाही. ज्यांनी अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेरकरांवर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिली आहे. त्यामुळे याबाबत कशाचेही समर्थन होणार नाही असेही सामंत म्हणाले.

नुकसान भरपाई मिळावी: पत्रकार शशिकांत वारीचे यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी आपण सर्व तोपरी मदत करत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी पत्रकार संघटनांची मागणी आहे. तशीच ती इतरांची ही मागणी आहे, त्याप्रमाणे आपण सरकारकडे त्याचा पाठपुरावा करीत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

जमिनीच्या चौकशीला तयार: जमीन कोणाची, दलाल कोण याबाबत चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, माझी किंवा माझ्या नातेवाईकांची जमीन असेल तर मी तात्काळ सोडायला तयार आहे. सर्वांचे चौकशी करा प्रत्येक पुढाऱ्याचे मोबाईल चेक करा. लोकशाहीमध्ये पत्रकाराने एखाद्या विरोधात लिहिणे हा लोकशाहीचा भाग आहे. त्याच्या विरोधात टोकाची भूमिका घेणे हे अयोग्यच आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व प्रकारच्या चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. मात्र हा केवळ बदनाम करण्याचा डाव आहे असा विचार त्यांनी केला.

केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात कारवाई नाही?: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अनेक प्रकरणांचा आरोप आहे. त्यांची चौकशी करण्याबाबत संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सत्तेत असताना राणे यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत महाविकास आघाडी सरकारने का चौकशी केली नाही? का त्यांच्या फाईल उघड्या केल्या नाहीत? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: IMA Aggressive on Sanjay Rauts संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आयएमए आक्रमक नंतर केली सारवासारव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.