ETV Bharat / state

आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत - खासदार शिवेंद्रराजे

मोदी हे मोदी आहेत. मात्र छत्रपती शिवाजी सगळ्यांच्या वर आहेत. मोदी कधी विष्णूंचा तर कधी शिवरायांचा अवतार असतात. मात्र, शिवराय आमचे दैवत आहेत. भाजपच्या नेत्यांनी यांनी यावर भूमिका स्पष्ट करावे. त्यांना हे मान्य आहे का ते सांगावे, संजय राऊतांचे आव्हान

संजय राऊत , खासदार शिवसेना
संजय राऊत , खासदार शिवसेना
author img

By

Published : Jan 13, 2020, 10:22 AM IST

Updated : Jan 13, 2020, 10:50 AM IST

मुंबई - नरेंद्र मोदींचा आम्ही आदर करतो. पण कितीही मोठा नेता असला तर त्यांची तुलना छत्रपतींशी करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे आम्ही त्या पुस्तकाचा निषेध करतो. तसेच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आणि छत्रपतींच्या वंशजांनी तत्काळ प्रतिक्रिया द्याव्यात, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच त्यांनी अशा प्रकारानंतर शिवरायांचे वंशज म्हणून त्यांना जाब विचारत पदांचा राजीनामा द्यायला हवा, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी व्यक्त केले. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात आज घेतलेल्या प्रत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी हे मोदी आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी सगळ्यांच्या वर आहेत. मोदी कधी विष्णूंचा अवतार असतात. तर कधी शिवराय होतात. भाजपच्या लोकांना हे मान्य असेल कदाचित. मात्र, शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्याशी तुलना आम्हाला खपनार नाही. त्यामुळे आज के शिवाजी या पुस्तकावर मोदींसह भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांना हे मान्य आहे का ते त्यांनी जनतेपुढे सांगावे, ही आमची भूमिका असल्याचे मत संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राऊत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या ट्विटलाही उत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्या नेत्यासोबत केली तर शिवरायांचे वंशज म्हणून प्रथम त्यांनी याबाबत जाब विचारायला हवा होता. त्यामुळे मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे वंशजांना मान्य आहे का? अशा सवाल केला. यावर त्रागा करण्यासारखे काय आहे, असा सवाल त्यांनी केला. जनतेलाही याचे उत्तर हवे आहे. या शिवाय त्यांनी सर्वात आधी शिवरायांचे वंशज म्हणून तुमच्या पदाचे राजीनामे द्यायला हवेत, असेही राऊत म्हणाले.

शिवरायांच्या वंशजांना मी प्रश्न विचारल्याबाबत मी आमच्या पक्ष नेतृत्वाशी चर्चाही केली आहे. त्यांनी आपली भूमिका योग्य असल्याचेच म्हटले आहे. शिवरायही आपली अस्मिता आहे. त्यांच्याशी एखाद्या राजकीय नेत्याशी तुलना म्हणजे महाराष्ट्रासह मराठी जनतेचा अपमान असल्याचे उद्धव यांचे मत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर भाजप नेते आज त्यांची भूमिका मांडतील, अशी आशा आहे. जर सावरकरांवर तत्काळ प्रतिक्रिया दिली जाते तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या प्रश्नावर ही ती आलीच पाहिजे. त्यामुळे भाजपने हे पुस्तक मागे घेऊन या पुस्तकावर बंदी घालून याच्याशी संबंध नसल्याचे सांगावे. असे म्हणत राऊतांनी मागच्या पाच वर्षात शिवरायांच्या आशीर्वादाने सत्ता चालवणाऱ्या भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ज्या व्यक्तीने महाराष्ट्र सदनावर हल्ला केला. मी माझ्या वतीने त्याला आव्हान देऊन, त्याच्या घरावर माणसं पाठवून त्याला पळवून लावले होते. अशा व्यक्तीकडून महाराष्ट्रच्या अस्मितेचा अपमान होत असेल तर भाजपने लवकरात प्रतिक्रिया द्यायला हवी. ते या राज्यात राज्यकर्ते होते. शिवरायांचे स्मारक बांधणार होते. बर झाले त्यांनी स्मारक बांधले नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Intro:Body:

sanjay raut

Conclusion:
Last Updated : Jan 13, 2020, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.