मुंबई: दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, फटाके, फराळ यासोबतच मातीचा किल्ला देखील आलाच. दिवाळीत घराबाहेर किल्ला बनवणे, आता फार कमी झालं आहे. तरी देखील अनेक हौशी लोक मात्र वेळात वेळ काढून किल्ला बनवतातच. अनेक जण कारण सांगतात वेळ नाही मिळत. Diwali Celebrations कामाचा व्याप खूप आहे आणि किल्ला बनवणे टाळतात. त्यात राजकारणी म्हटलं तर दिवसभर काम आणि बैठका. मात्र, आपल्या राज्याच्या माजी मंत्र्यांन वेळात वेळ काढून किल्ला बनवलाय आणि हे माजी मंत्री म्हणजे खुद्द आदित्य ठाकरे shivsena leader aaditya thackeray आहेत.
मातोश्रीवर किल्ला: शिवसेनेतील बंडखोरीनंतर मागच्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेली मातोश्री आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ती आदित्य ठाकरे यांनी बनवलेल्या किल्ल्यामुळे. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री बाहेर लहान मुलांसोबत मातीचा किल्ला बनवलाय. यात स्वतः आदित्य ठाकरे मातीत हात घालून किल्ला बनवताना दिसत आहेत. या किल्ला बनवण्याच्या कामात त्यांना मदत लहान मुलांनी केली आहे. अतिशय सुंदर रेखीव असा किल्ला आदित्य ठाकरे व सर्व चिमुकल्यांनी मिळून बनवला आहे.
किल्ला बांधण्याचा काम सुरू: आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवला आणि लहान मुलांना किल्ला बनवण्यात मदत केली. समस्त शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान समजल्या जाणाऱ्या मातोश्री या निवासस्थानी दिवाळीनिमित्त काही लहान मुलांनी किल्ला बांधण्याचा काम सुरू केलं होतं. आदित्य ठाकरे तिथे पोहोचताच त्यांनी त्या मुलांचं कौतुक केलं.